आजवर तुम्ही कुळीथ पिठापासून पिठलं बनवलं असेल पण आता कुळीथाचं माडगं हा काय प्रकार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एक स्थानिक पारंपारिक असा हा पदार्थ. कुळीथाचं मांडगं म्हणजे कुळीथापासून बनवलेला हा एक वेगळ्या प्रकारचा चहाच म्हणा. हा कुळीथाचा चहा तुम्ही एकदा का प्यायलात तर याच्यासमोर तुम्हाला चहा, कॉफी आणि ग्रीन टीही फिका वाटेल. संपूर्ण थंडीत किंबहुना थंडी संपली तरी तुम्ही हाच चहा प्याल.
advertisement
Dudhi Bhopla Recipe : दुधी भोपळा आहे कळणारच नाही; भाजी न खाणारेही खातील दुधीचं भगराळं
आता कुळीथाचं माडगं कसं बनवायचं त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहुयात.
कुळीथाचं माडगं बनवण्यासाठी साहित्य
कुळीथ
पाणी
गूळ
शिजवलेला भात
मीठ
कुळीथाचं माडगं कसं बनवायचं? कृती
कुळीथ तव्यावर चांगले भाजून घ्या. ते जाडसर भरडून त्यातील कोंडा काढून घ्या. आता एका भांड्यात पाणी घ्या. त्यात भरडलेले कुळीथ मिक्स करून घ्या. आता गॅसवर दुसरं भांडं ठेवून त्यात पाणी गरम करून घ्या. गूळ टाका, गूळ वितळलं की पाण्यात भिजवलेली कुळीथाची भरड, थोडा शिजलेला भात आणि मीठ टाकून चांगलं शिजवून घ्या. कुळीथाचं माडगं तयार.
Papad Recipe : पापडावर बेसन पीठ, एकदम नवीन पदार्थ; पोट भरेल पण मन म्हणेल आणखी खा
टेस्टी चव फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही कधी कुळीथाचं माडगं बनवलं होतं का? प्यायला होतात का? नसेल तर कुळीथाचं माडगं एकदा बनवून पाहा आणि कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तुम्ही कुळीथापासून अशी काय वेगळी रेसिपी बनवता, याशिवाय तुमच्याकडेही अशा काही पारंपारिक रेसिपी असतील तर त्याची माहिती आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
