सोमवारपासून या मार्गाची सुरक्षा चाचणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील तीन-चार दिवस ती सुरू राहणार आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर CMRS कडून अंतिम प्रमाणपत्र दिलं जाईल. हे प्रमाणपत्र मिळताच दुसऱ्या टप्प्याचा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाईल.
मुंबईकरांनो, पाणी उकळून आणि गाळूनच प्या, अन्यथा धोका, BMC नं का केलं आवाहन?
मेट्रो-3 चा विस्तार
advertisement
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 33.5 किमी लांबीच्या मेट्रो-3 मार्गावर काम सुरू आहे, ज्यात एकूण 27 स्थानकांचा समावेश आहे. यातील पहिला टप्पा आरे ते बीकेसी ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाला आहे. सध्या 10 स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात बीकेसीपासून वरळी नाक्याजवळील आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या टप्प्यात एकूण 7 स्थानकांचा समावेश आहे. बीकेसी, धारावी, शितळादेवी मंदिर, दादर, सिद्धीविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांदरम्यान मेट्रो धावणार आहे.
एमएमआरसीने या टप्प्यातील तांत्रिक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या असून, CMRS कडून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरु होणार आहे. त्यामुळे आरे ते वरळी दरम्यानचा प्रवास आणखी सोयीस्कर व जलद होणार आहे.
महत्वाचे
दुसऱ्या टप्प्याची लांबी – 9.77 किमी
नवीन सुरू होणारी स्थानके – 7
संभाव्य सुरुवात – एप्रिल दुसऱ्या आठवड्यात
प्रवाशांना दिलासा – ट्राफिकपासून मुक्ती व वेळेची बचत