TRENDING:

समृद्ध भारतासाठीच्या व्यापक सुधारणा पंतप्रधानांनी केल्या अधोरेखीत

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर भारताची रिफॉर्म एक्सप्रेस वेगाने पुढे जात असल्याचे सांगितले, पायाभूत सुविधा, उत्पादन, डिजिटल वस्तुमाल आणि व्यवसाय सुलभतेवर भर दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सरकारच्या गुंतवणुकीला मोठी चालना देणाऱ्या तसेच मागणीवर आधारित व्यापक धोरणांमुळे भारताची रिफॉर्म एक्सप्रेस अर्थात सुधारणांची एक्सप्रेस वेग जारी राखत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखीत केली आहे.
News18
News18
advertisement

पायाभूत सुविधा, उत्पादन, डिजिटल स्वरुपातील सार्वजनिक वस्तुमाल आणि व्यवसाय सुलभता यांसारख्या क्षेत्रांमधील क्रांतिकारी उपक्रमांच्या माध्यमातून समृद्ध भारताचा सरकारचा संकल्प साकार होत असल्याचेही पंतप्रधानांनी ठळकपणे अधोरेखीत केले आहे. भारताच्या आर्थिक पायाला बळकटी देण्यासाठी, जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि सर्व नागरिकांचा सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्याच्या दृष्टीनेच या सुधारणांची आखणी केली गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

advertisement

या संदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश:

भारताची रिफॉर्म एक्सप्रेस वेग जारी राखत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गुंतवणूक विषयक तसेच मागणीवर आधारित व्यापक धोरणांमुळे या सुधारणांना बळ मिळते आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

पायाभूत सुविधा असोत, उत्पादन क्षेत्रातील प्रोत्साहन असो, डिजिटल स्वरुपातील सार्वजनिक वस्तुमाल असो अथवा व्यवसाय सुलभता असो, आम्ही समृद्ध भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी काम करत आहोत.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
समृद्ध भारतासाठीच्या व्यापक सुधारणा पंतप्रधानांनी केल्या अधोरेखीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल