सुरेश धस प्राजक्ता माळीबद्दल काय म्हणाले होते?
धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत आणि राजकारणाबाबत सुरेश धस यांना विचारले असता, “धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे, येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा,” अशी उपहासात्मक टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर केली.
advertisement
दरम्यान, या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. तिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत याबाबत तिचं मत मांडत आहे.
पत्रकार परिषद सुरू होण्याआधी प्राजक्ता रडलेली होती, तिचे डोळे पाणावलेले आणि सुजलेले दिसत होते. प्राजक्ता म्हणाली, “मी या आधीही हजारो नेते आणि मान्यवरांसोबत फोटो काढले आहे. मग त्यांच्यासोबत नाव जोडणार का? हे खूपच कुस्थित आहे. कोणता पुरुष कलाकार परळीला आला नाही का. कोणतीही महिला कोणत्याही पुरुषाच्या, राजकारण्याच्या आधाराशिवाय मोठी होऊ शकत नाही का. तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावांचा वापर करणे बंद करावा. हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. इतक्या कुस्थितपणे आमची खिल्ली उडवली आणि हशा पिकवला, त्यांनी आमची जाहीर माफी मागावी. महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.”
मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्राजक्ता माळीची बाजू घेत सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं आहे. प्राजक्ता माळीची माफी मागा अशी मागणी त्यांनी केली आहे.
