आरोपीवर MCOCA लावला
गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने ही कारवाई केली असून, रामदास बबन कचरे असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या गुन्हेगारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे, पण तो तेव्हापासून फरार होता.
कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी
रामदास कचरे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर हिंजवडी आणि पौड पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी चांदणी चौक परिसरात कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणात हिंजवडी पोलिसांनी त्याला त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांसह पकडले होते.
advertisement
कामगाराच्या डोक्यात दारूची बाटली फोडली
त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता आणि जबरी चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले होते. हॉटेल कामगाराच्या डोक्यात दारूची बाटली मारून त्याला जखमी केल्यानंतर रामदास कचरे पुन्हा एकदा फरार झाला होता, पण आता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारी
दरम्यान, पुणे शहरातील गुन्हेगारी हा सर्वात चिंतेचा विषय सध्या बनली आहे. या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असून अवैध शस्त्र गुंडांच्या टोळींना पुरवले जात आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी थेट बेकायदेशीर शस्त्रसाठा जिथून पुण्यात येतो अशा ठिकाणी जाऊन ती कंपनीच उध्वस्त केली आहे. त्यामुळे आता पुण्यातील गुन्हेगारीला आळा बसणार का? असा सवाल विचारला जात आहे.
