सोलापूर : घरगुती वापराच्या गॅसच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी गॅस वापरणं परवडत नसल्याचं बोलताना अनेकांककडून ऐकलं असेल. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं यावर एक शक्कल लढवलीये. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळचे नागेश अर्जुन ननवरे हे गेल्या 20 वर्षांपासून चक्क मोफत गॅस वापरत आहेत. फक्त 6 हजार रुपयांच्या खर्चात त्यांनी गॅसचा प्रश्न कायमचा निकाली काढला आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून कृषिभूषण शेतकरी नागेश ननवरे यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
बीबी दारफळ येथील शेतकरी नागेश ननवरे 20 वर्षापासून घरात गोबर गॅस वापरत आहेत. दररोज 3 वेळच्याचा स्वयंपाक या गोबर गॅसपासून मिळणाऱ्या इंधनावर होत आहे. घरगुती सिलेंडरचे दर पाहता वर्षाला शेतकरी नागेश ननवरे यांची 12 हजार रुपये पर्यंत बचत होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या दारात जनावरे आहेत, त्यांनी शेणापासून गोबर गॅसची निर्मिती करून त्याचा वापर करावा. जनावराच्या शेणापासून गोबर गॅस तयार करण्यासाठी 20 किलो शेण आणि 70 लिटर पाण्याची आवश्यकता असते. यापासून मिळणाऱ्या इंधनावर दररोज 6 माणसाचा स्वयंपाक होतो. तसेच गॅस तयार झाल्यानंतर त्यापासून मिळणारी स्लरी ही शेतात उत्तम प्रकारे खत म्हणून वापरता येतो, असे शेतकरी सांगतात.
6 हजारांत गॅस युनिट
नागेश ननवरे हे आधी जुन्या पद्धतीने गोबर गॅस निर्मिती करत होते. 3 वर्षांपूर्वी नागेश यांनी आधुनिक पद्धतीचे शेणापासून तयार होणाऱ्या गोबर गॅसच्या युनिटची निर्मिती केली आहे. आधुनिक पद्धतीने युनिट तयार करण्यासाठी कमीत कमी 6 हजार रुपयापर्यंतचा खर्च येतो. 6 बाय 6 आणि खोली 4 फूट या पद्धतीने हा गोबर गॅस युनिट तयार करण्यात आला आहे. तसेच हा युनिट 10 वर्षांपर्यंत सुस्थितीत राहतो, असं ननवरे सांगतात.
गाईच्या शेणाशी संपर्क आल्याने कोणताही प्रकारचा रोग होत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा त्वचारोग होत नाही आणि शरीर निरोगी राहते. गोबर गॅस पासून मिळणाऱ्या इंधनावर स्वयंपाक देखील चांगला होतो. शेतकऱ्यांनी जास्त गॅसचा वापर होण्याकरता शेणापासून तयार होणाऱ्या गोबर गॅसचा वापर करावा. जेणेकरून तुमचं आरोग्य देखील चांगलं राहतं आणि गॅसवर होणारा खर्च देखील कमी होतो. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतही होते, असंही ननवरे यांनी सांगितलं.