काय म्हणाला सूर्या?
मी आजपर्यंत एबी डिव्हिलियर्सला भेटलोच नाही. मी त्याला हाय हॅलो केलं. पण मी त्याला असं बसून 15 ते 20 मिनिटं कधी बोललो नाही. जर मी त्याला भेटलो तर मी त्याला नक्की काही प्रश्न विचारेल, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. मला त्याला विचारायचं की, त्याने टी-ट्वेंटी आणि वनडे संघात बॅलेन्स कसा निर्माण केला? कारण मला ते जमत नाही. कारण मला वाटतं की, वनडे क्रिकेट देखील टी-ट्वेंटीसारखं खेळलं पाहिजे. एबी डिव्हिलियर्सने तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. पण त्याने हे कसं केलं? यावर मी नक्की त्याला प्रश्न विचारेल, असं सूर्या म्हणाला. विमल कुमार यांच्यासोबतच्या मुलाखतीत सूर्याने हे वक्तव्य केलंय.
advertisement
जर तू मला ऐकत असशील तर प्लीझ...
एबी डिव्हिलियर्स जर तू मला ऐकत असशील तर प्लीझ माझ्याशी तात्काळ संपर्क कर. कारण पुढीच तीन ते चार वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. मला आगामी काळात वनडे क्रिकेट देखील खेळायचं आहे. त्यामुळे मला तातडीने मदत कर, मला वनडे क्रिकेट आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये फरक करायला जमत नाहीये, असं म्हणत सूर्यकुमार यादवने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुन्हा वनडे संघात जागा मिळणार का?
दरम्यान, सूर्यकुमार यादव याने 2021 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि शेवटचा सामना 2023 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये वनडे सामना खेळला. तेव्हापासून तो फक्त टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. सूर्यकुमार यादवला वनडे संघात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतर त्याला वनडे संघातून ड्रॉप करण्यात आलं होतं. अशातच आता सूर्यकुमारला पुन्हा वनडे संघात जागा मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
