TRENDING:

Shocking! इंजिन सुरू ठेवून चालक चहा प्यायला उतरला; ट्रेन चालकाशिवायच धावू लागली, अन् 84 KM नंतर...

Last Updated:

उतारामुळे ही ट्रेन ड्रायव्हरशिवायच धावू लागली. त्यानंतर जवळपास 84 किलोमीटरपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय धावत राहिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने निघाली. उतारामुळे ही ट्रेन ड्रायव्हरशिवायच धावू लागली. त्यानंतर जवळपास 84 किलोमीटरपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय धावत राहिली. या घटनेनं रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. घाईघाईत खूप प्रयत्नांनंतर ट्रेन पंजाबच्या मुकेरियनमधील उन्ची बस्सीजवळ थांबवण्यात आली.
ट्रेन चालकाशिवायच धावली (प्रतिकात्मक फोटो)
ट्रेन चालकाशिवायच धावली (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचं जम्मूचे विभागीय वाहतूक व्यवस्थापक सांगतात. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी 7.10 च्या सुमारास घडली. चालकाने जम्मू येथील कठुआ येथे मालगाडी क्रमांक 14806R थांबवली होती. इकडे ड्रायव्हर ट्रेनमधून खाली उतरून चहा प्यायला गेला. दरम्यान, ट्रेन अचानक जागेवरून हलू लागली आणि मग वेग पकडून धावू लागली.

advertisement

कठुआ रेल्वे स्थानकाजवळील सूत्रांनी सांगितलं की, मालगाडी काँक्रीट वाहून नेत होती. हे काँक्रीट कठुआ येथून भरण्यात आलं होतं. चालक आणि सहचालक चहासाठी थांबले तेव्हा इंजिन चालू होतं. दरम्यान, सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी अचानक ट्रेन सुरू झाली. गाडीतून उतरण्यापूर्वी ड्रायव्हरने हँडब्रेक ओढला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

या देशात सापच नाहीत; सर्पदंशामुळे आजपर्यंत झाला नाही एकही मृत्यू, नाव जाणून व्हाल चकित

advertisement

यानंतर जेव्हा चालकाने गाडी सुरू झाल्याचं पाहिलं तेव्हा तो गोंधळला. या प्रकरणाची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक प्रयत्न अयशस्वी झाले. यानंतर दसुहाजवळील उची बस्ती परिसरात पॅसेंजर गाड्यांचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली. तोपर्यंत ट्रेनने 84 किलोमीटर अंतर कापलं होतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पीक कर्ज घेणाऱ्यासाठी गुड न्यूज; मुद्रांक शुल्काचा खर्च वाचणार, कसा होणार फायदा?
सर्व पहा

सुदैवाने समोरच्या रुळावर दुसरी गाडी नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेत जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. रेल्वेनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून कारणं शोधण्यासाठी फिरोजपूर येथून एक पथक पाठवण्यात आलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Shocking! इंजिन सुरू ठेवून चालक चहा प्यायला उतरला; ट्रेन चालकाशिवायच धावू लागली, अन् 84 KM नंतर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल