पुण्यात माध्यमांसोबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. औरंगजेबाच्या थडग्याचा समाधी म्हणून उल्लेख केल्याची टीका ठाकरे गटाने केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करत शिवाजी असे केले. त्यावरून राऊतांनी शाह यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले.
advertisement
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, अमित शाह यांच्या दौऱ्याच स्वागत करायचे सोडून संजय राऊत टीका करतात. त्यांना कुणी प्रतिसाद देत नाहीत. अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 500 पानांचे पुस्तक येत आहे. ते वाचल्यावर राऊत यांना अमित शाह यांचा शिवाजी महाराज यांचाबद्दलचा अभ्यास समजेल असा टोलाही पाटील यांनी लगावला. राजकीय दुश्मनी असावी, मात्र देशाचे गृहमंत्री पहिल्यांदा अशा प्रकारच्या कार्यक्रमप्रसंगी रायगडला आले असताना त्यांच्या या कृतीचे स्वागत होणआवश्यक होते असेही त्यांनी म्हटले.
ठाकरेंना सत्तेत यायचं, पण...
चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हटले की, संजय राऊत हे फक्त अमित शहा यांचा दुस्वास करत आहेत. कारण ते सत्तेमध्ये नाहीत आणि त्यांना सत्तेमध्ये यायचंय आहे. मात्र आम्ही त्यांना घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
उमेदवारही सापडणार नाही...
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे. आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्याकडे उभे करायला देखील लोक राहणार नाही. आता पुण्यातील पाच माजी नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. तसेच मुंबईतील 92 पैकी 57 माझी नगरसेवक शिंदें सोबत गेले आहेत. त्यामुळे पुणे, नागपूर सोडा पण मुंबईतच शिवसेना ठाकरे गटाला उमेदवार सापडणार नसल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.