TRENDING:

Banana Farming: ऊस शेतीला फाटा, 70 गुंठ्यात लावलं पैशाचं पीक, पहिल्याच वर्षी रेकॉर्ड ब्रेक कमाई!

Last Updated:
Banana Farming: सध्याच्या काळात अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. सांगलीतील शेतकरी केळीच्या शेतीतून लाखोंची कमाई करत आहे.
advertisement
1/7
ऊस शेतीला फाटा, 70 गुंठ्यात लावलं पैशाचं पीक, पहिल्याच वर्षी रेकॉर्ड ब्रेक कमाई!
सांगली जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळ पिकांना पसंती देत आहेत. कडेगाव तालुक्यातील शेतकरी उसाला पर्याय म्हणून नवनवीन प्रयोग करत आहेत. वांगी येथील सर्वोदय शंकर सूर्यवंशी यांनी केळी पिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे. सूर्यवंशी यांनी 70 गुंठे क्षेत्रात केळीचे 45 टन उच्चांकी उत्पादन घेतले असून तब्बल नऊ लाखांचे उत्पन्न कमावले आहे.
advertisement
2/7
हलकी व मध्यम स्वरूपाची जमीन असूनदेखील योग्य पद्धतीने पाण्याचे, खतांचे नियोजन केल्यास शेतकरी केळी पिकातून लाखो रुपये मिळवू शकतात हे त्यांनी सिद्ध केले आहे. सूर्यवंशी यांनी मार्च 2024 मध्ये शेतात दोनवेळा नांगरट व रोटर मारून योग्य पद्धतीने जमिनीची मशागत करून घेतली.
advertisement
3/7
सूर्यवंशी यांनी शेणखत, पोल्ट्री खत व पालाशचा वापर करून स्वतः कंपोस्ट खत तयार करुन शेतात पसरले. त्यानंतर 18.50 रुपये प्रमाणे केळीची रोपे खरेदी केली. 70 गुंठे क्षेत्रात 1550 रोपांची लागवड 6×5 फूट अंतरावर केली. पाणी व विद्राव्य खतांच्या वापरासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला.
advertisement
4/7
केळी पिकाला वेळेत औषध फवारण्या दिल्या, दोन वेळा रासायनिक खतांचा बसल डोस दिला. योग्य नियोजनामुळे सूर्यवंशी यांना 45 टनांचे उत्पन्न घेणे शक्य झाले. केळीचा दर्जा उत्तम असल्याने सर्व केळी विदेशी बाजारात प्रतिकिलो सरासरी 20 रुपया प्रमाणे विक्री झाली. त्यामुळे त्यांना केळी पिकातून मोठा नफा मिळवता आला.
advertisement
5/7
सर्वोदय सूर्यवंशी यांनी केळी लागबड केल्यानंर झेंडूचे आंतरपीक घेतले होते. झेंडूतून त्यांना दिड लाखाचे उत्पन्न मिळाले. केळी लागवडीसाठीचा निम्म्याहुन अधिक खर्च झेंडूच्या अंतर पिकातून बाहेर पडला. याशिवाय झेंडूच्या अंतर पिकामुळे केळीचे उत्पादन वाढण्यात ही मोठी मदत झाल्याचे सूर्यवंशी सांगतात.
advertisement
6/7
प्रयोगशील शेतकरी सर्वोदय सूर्यवंशी यांनी आता केळी पिकाच्या खोडव्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. केळीच्या पहिल्या वर्षांतून 9 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर आता याच केळीच्या खोडवा पिकातून सुमारे 35 टन उत्पादन अपेक्षित असून यातून त्यांना पाच लाखांचे अर्थिक उत्पन्न अपेक्षित आहे.
advertisement
7/7
शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत वेगळे प्रयोग करावेत. केळीची शेती योग्य नियोजनाने केल्यास अत्यंत फायद्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळले पाहिजे, असे सर्वोदय सूर्यवंशी सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Banana Farming: ऊस शेतीला फाटा, 70 गुंठ्यात लावलं पैशाचं पीक, पहिल्याच वर्षी रेकॉर्ड ब्रेक कमाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल