TRENDING:

Farmer Success Story: मराठवाड्यातील शेतकऱ्याची कमाल, एका एकरात केला नवीन प्रयोग, दरवर्षी 11 लाख नफा

Last Updated:
Farmer Success Story: परमेश्वर थोरात यांनी नव्या विचारसरणीचा स्वीकार करून शेतीत यश मिळवलं आहे. त्यांनी अवघ्या एका एकरात शेती करून दरवर्षी 11 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळवला आहे.
advertisement
1/6
मराठवाड्यातील शेतकऱ्याची कमाल, एका एकरात केला नवीन प्रयोग, दरवर्षी 11 लाख नफा
बीड जिल्हा हा सतत पावसाच्या कमतरतेमुळे आणि टंचाईमुळे चर्चेत असतो. विशेषतः डोंगराळ भागांमध्ये शेती करणे म्हणजे मोठं धाडस. पाण्याचा तुटवडा आणि नापिकी यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
advertisement
2/6
मात्र अशाच कठीण परिस्थितीत शिवणी गावचे परमेश्वर थोरात यांनी नव्या विचारसरणीचा स्वीकार करून शेतीत यश मिळवलं आहे. त्यांनी अवघ्या एका एकरात अव्होकॅडोची शेती करून दरवर्षी 11 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळवला आहे.
advertisement
3/6
थोरात यांच्याकडे पाच एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र दरवर्षी वाढणारा खर्च, पाण्याची कमतरता आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे त्यांना फारसा फायदा होत नव्हता.
advertisement
4/6
यामुळे त्यांनी शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. एके दिवशी त्यांनी यूट्यूबवर अव्होकॅडो या फळाबद्दल माहिती पाहिली आणि त्यातून प्रेरणा घेतली.
advertisement
5/6
अव्होकॅडो हे विदेशी फळ कमी पाण्यातही चांगले उत्पादन देते आणि बाजारात त्याला भरपूर मागणी आहे. हे लक्षात आल्यावर त्यांनी सखोल अभ्यास सुरू केला. नुसती माहिती न घेता त्यांनी प्रत्यक्ष कृती सुरू केली. एका एकर क्षेत्रात काही झाडे लावून प्रयोग केला. योग्य काळजी घेतल्यानंतर झाडं चांगली वाढली आणि काही वर्षांत फळधारणा सुरू झाली.
advertisement
6/6
आज त्या एक एकर अव्होकॅडो शेतीतून परमेश्वर थोरात यांना प्रतिवर्षी किमान 11 लाख रुपयांचा नफा मिळतो. उर्वरित चार एकरमध्ये ते अजूनही पारंपरिक शेती करत आहेत. मात्र भविष्यात अधिक क्षेत्रात अव्होकॅडोची लागवड करण्याचा त्यांचा विचार आहे. कमी पाण्यात जास्त नफा मिळवणारी ही शेती त्यांच्यासाठी वरदान ठरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success Story: मराठवाड्यातील शेतकऱ्याची कमाल, एका एकरात केला नवीन प्रयोग, दरवर्षी 11 लाख नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल