TRENDING:

Bailgada Sharyat: तब्बल 85 लाखांना मागितला बैल, मालक म्हणतो देणार नाही, पण कारण काय?

Last Updated:
Bailgada Sharyat: छत्रपती संभाजीनगरमधील एका बैलाला तब्बल 85 लाख रुपयांना विकत मागितलं आहे. पण 4 वर्षांच्या या बैलाला विकण्यास मालक तयार नाही.
advertisement
1/7
Bailgada Sharyat: तब्बल 85 लाखांना मागितला बैल, मालक म्हणतो देणार नाही, कारण काय
महाराष्ट्र आणि कर्नाटकात बैलगाडा शर्यतीचे अनेक चाहते आहेत. एखादी यात्रा, उत्सव आणि बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांच्या शर्यती किंवा बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. या शर्यतीत छत्रपती संभाजीनगरमधील एक बैल वेगाचा बादशहा म्हणूनच ओळखला जातोय.
advertisement
2/7
नुकतेच बैलपोळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरात झालेल्या स्पर्धेत मनोहर चव्हाण यांच्या लखन या बैलाने बाजी मारली. त्यानंतर त्याच्या वेगाची आणि बक्षिसांची सर्वत्र चर्चा होतेय. आत्तापर्यंत लखनने 70 लाखापेक्षा जास्त किमतीची बक्षिसे जिंकली आहेत.
advertisement
3/7
करोडी येथील मनोहर चव्हाण यांचा हा लखन नावाचा बैल मैसूर जातीचा आहे. ‘लखन’ सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या स्पर्धा गाजवतोय. या स्पर्धांमध्ये त्याने शेकडो बक्षिसे जिंकली असून त्याला शर्यतीचा राजा म्हटलं जातंय.
advertisement
4/7
मनोहर यांनी चार वर्षांचा लखन दोन वर्षांपूर्वी साडेबारा लाखांना विकत घेतला होता. या दोन वर्षांत त्याने आपल्या मालकाला तब्बल 70 लाखांची कमाई करून दिली आहे. विविध शर्यतीत भाग घेऊन त्याने तीन बुलेट आणि चौदा दुचाकी जिंकल्या आहेत.
advertisement
5/7
लखनचा खुराक देखील तसाच तगडा आहे. कोरडा चारा, मका, रोज 10 लिटर दूध, 10 अंडी आणि दीड किलो काजू-बदाम असं पौष्टिक खाद्य दिलं जातं. हाच त्याच्या ताकदीचा आणि वेगाचा मुख्य आधार मानला जातो. फलटणसारख्या मोठ्या शर्यतीत लखनने 5 लाखांचं बक्षीस पटकावलं आहे.
advertisement
6/7
लखचना स्वभाव शांत आहे, मात्र शर्यतीत उतरल्यावर त्याचा वेग पाहून सगळे थक्क होतात. त्याला शिकवण्यासाठी तब्बल 25 एकर जमीन पडीत ठेवली आहे. एवढी मेहनत आणि काळजी घेतल्यामुळेच लखन आज प्रत्येक स्पर्धेत झेंडा फडकवतो आहे, असं मालक मनोहर चव्हाण सांगतात.
advertisement
7/7
लखनसाठी दोन वर्षांपूर्वी तब्बल 85 लाखांची मागणी आली होती. मात्र मालक मनोहर चव्हाण यांनी विकण्यास नकार दिला. आज शर्यतीत लखन हे नाव ताकद, वेग आणि विजयाचं प्रतीक ठरलं असून महाराष्ट्र आणि कर्नाटकात शर्यतीचा राजा म्हणूनच त्याची ओळख आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Bailgada Sharyat: तब्बल 85 लाखांना मागितला बैल, मालक म्हणतो देणार नाही, पण कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल