Farmer Success Story: 3 वर्षांपासून लागवड, टोमॅटो शेतीने पालटलं शेतकऱ्याचं नशीब, आता कमाई लाखात!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. शेतकरी हनुमंत देशमुख यांना टोमॅटो शेतीतून तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
advertisement
1/7

शेतकरी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील शेतकरी हनुमंत देशमुख यांनी अर्धा एकर टोमॅटो लागवड केली असून टोमॅटोची रोपे, खत, फवारणी यांचा सर्व खर्च वजा करून टोमॅटो विक्रीतून शेतकरी हनुमंत देशमुख यांना तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी हनुमंत देशमुख यांनी दिली आहे.
advertisement
2/7
मोहोळ तालुक्यातील शेतकरी हनुमंत हे दोन ते तीन वर्षांपासून अर्ध्या एकरात टोमॅटोची लागवड करत आहेत. यावर्षी सुद्धा अर्ध्या एकरामध्ये दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोची लागवड केली आहे.
advertisement
3/7
टोमॅटोची लागवड करण्याअगोदर शेतामध्ये नांगरणी करून शेणखत, भेसळ खत टाकून नर्सरीमधून टोमॅटोचे रोप आणून अर्ध्या एकरमध्ये लागवड केली.
advertisement
4/7
लागवड केल्यानंतर टोमॅटोवर नागअळी आणि करपा रोग होऊ नये म्हणून औषधांची फवारणी करून घेतली. जवळपास अर्ध्या एकरामध्ये हनुमंत यांनी 5 हजार टोमॅटो रोपांची लागवड केली आहे.
advertisement
5/7
अर्ध्या एकरामध्ये टोमॅटो लागवडीसाठी जवळपास एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च शेतकरी हनुमंत देशमुख यांना आला आहे. तर या टोमॅटो विक्रीतून सर्व खर्च वजा करून तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
advertisement
6/7
हनुमंत देशमुख यांचा टोमॅटो सोलापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, तसेच दिल्ली येथील मार्केटला विक्रीसाठी पाठवला जातो. मागील वर्षी देखील अर्ध्या एकरात टोमॅटो विक्रीतून शेतकरी हनुमंत देशमुख यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
advertisement
7/7
तर यावर्षी टोमॅटोला चांगला दर असून तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती हनुमंत देशमुख यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success Story: 3 वर्षांपासून लागवड, टोमॅटो शेतीने पालटलं शेतकऱ्याचं नशीब, आता कमाई लाखात!