TRENDING:

ऊसाच्या शेतीत ड्रोनमुळे फळफळलं नशीब, शेतकऱ्यानं सांगितलं नक्की काय घडलं?

Last Updated:
अलीकडे शेती क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरले जाते. ऊस पिकामध्ये कीटकनाशकासह विविध प्रकारच्या फवारण्यांसाठी ड्रोनचा वापर वाढतो आहे.
advertisement
1/7
ऊसाच्या शेतीत ड्रोनमुळे फळफळलं नशीब, शेतकऱ्यानं सांगितलं नक्की काय घडलं?
अलीकडे शेती क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरले जाते. ऊस पिकामध्ये कीटकनाशकासह विविध प्रकारच्या फवारण्यांसाठी ड्रोनचा वापर वाढतो आहे.
advertisement
2/7
ऊस पिकामध्ये ड्रोन-तंत्रज्ञान कसे फायदेशीर ठरते याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकल 18 च्या प्रतिनिधींनी ड्रोनचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वाळवा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी महादेव पाटील यांनी त्यांचा अनुभव सांगितला.
advertisement
3/7
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द गावामध्ये महादेव पाटील यांची एक एकर शेती आहे. यामध्ये त्यांना गुंठ्याला सरासरी पावणेदोन टन इतके ऊस उत्पादन मिळत होते. ड्रोनच्या वापरापासून ऊस उत्पादनामध्ये 10 टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
4/7
ड्रोन वापराचे फायदे : औषध फवारणीसाठी कृषी ड्रोनच्या वापरामुळे पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत अल्प वेळात खते आणि कीटकनाशकाची फवारणी शक्य होते.बदलत्या हवामानात पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. याचा फटका उत्पादनास बसतो. उत्पादनात होणारी घट रोखण्यासाठी किडीचा प्रादुर्भाव ओळखून जलद फवारणी फायदेशीर ठरते.
advertisement
5/7
यासाठी ड्रोनचा वापर उपयोगी ठरत आहे.ऊस उंच गेल्यानंतर पारंपरिक पद्धतीत पंपाने फवारणी करणे त्रासदायक ठरते. अशावेळी ड्रोन फवारणी उपयोगी पडते.
advertisement
6/7
ड्रोन फवारणी करताना पाण्याचे अतिसूक्ष्म थेंब होऊन पिकाच्या पानांमध्ये बसतात. यामुळे पिकावरती औषधांचा परिणाम होतो.ड्रोन फवारणी मध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते.दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर पिकावर ती फवारणी होते.
advertisement
7/7
यासोबतच ड्रोनच्या वापरामुळे अवघ्या दहा मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्राची फवारणी करणे शक्य होत आहे.ऊस पिकामध्ये फवारणीसाठी ड्रोनचा वापर केल्याने वेळेच्यावेळी फवारण्या देण्यास मदत होते. तसेच वेळ, व्याप व मजुरांमध्ये बचत होऊन उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचा अनुभव महादेव पाटील यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
ऊसाच्या शेतीत ड्रोनमुळे फळफळलं नशीब, शेतकऱ्यानं सांगितलं नक्की काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल