Success Story : पोलीस भरतीत संधी हुकली, पाटील शेताकडे वळले, आता 2 लाखांची कमाई
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पुणे-मुंबईत जाऊन वर्षभर नोकरीचा शोध घेतला, परंतु पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे शेवटी थेट गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/5

नोकरीच्या मागे न लागता सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरजचे युवा शेतकरी सीताराम पाटील हे यापैकीच एक आहेत.
advertisement
2/5
उच्च शिक्षणानंतर पुण्या-मुंबईत नोकरी शोधली परंतु, मनासारखी नोकरी न मिळाल्याने थेट गाव गाठलं आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. आता अर्धा एकर मिरची शेतीतून ते लाखात कमाई करत आहेत. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/5
सीताराम पाटील यांनी एम.कॉमपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर खाकी वर्दीचं स्वप्न पाहून पोलीस भरतीची तयारी केली. परंतु, यशानं थोडक्यात हुलकावणी दिली. पुढे पुणे-मुंबईत जाऊन नोकरीचा विचार केला. वर्षभर नोकरीचा शोध घेतला परंतु पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे शेवटी थेट गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
4/5
सीताराम पाटील यांनी अर्ध्या एकरात एक्सपोर्ट दर्जाची जी 4 जातीची हिरवी मिरची लागवड केली. 5 बाय 1.50 फूट अंतरावर लागवड करण्यात आली असून या लागवडीसाठी सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च आला आहे. या मिरचीची विक्री एका खाजगी कंपनीसोबत करार पद्धतीने करण्यात येत असून प्रतिकिलो 40 रुपये दर मिळत आहे.
advertisement
5/5
दरम्यान, या अर्धा एकर मिरची शेतीतून खर्च वजा जाता सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत नफा अपेक्षित असल्याचे सीताराम सांगतात. तसेच उच्चशिक्षित तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय किंवा शेतीकडे वळावे. वडिलोपार्जित जमीन असेल तर आधुनिक शेती करून नोकरीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवता येते, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : पोलीस भरतीत संधी हुकली, पाटील शेताकडे वळले, आता 2 लाखांची कमाई