TRENDING:

Success Story : शेतकऱ्याची कमाल, एकरी घेतलं तब्बल इतकं टन उसाचे उत्पादन, अख्खं गाव पाहत राहिलं!

Last Updated:
Sugarcane Farming: पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. पंढपूरच्या शेतकऱ्यानं एकरी 125 टन उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे.
advertisement
1/5
शेतकऱ्याची कमाल, एकरी घेतलं तब्बल इतकं टन उसाचे उत्पादन, अख्खं गाव पाहत राहिलं
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सीताराम रणदिवे यांनी उसाचं योग्य नियोजन करत एकरी 125 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी सीताराम रणदिवे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
2/5
शेतकरी सीताराम रणदिवे हे पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावाचे आहेत. ते गेल्या काही काळापासून ऊस शेतीतून विक्रमी उत्पन्न घेत आहेत. ऊस शेतीच्या यशाचं गुपित सांगताना शेतकरी सीताराम रणदिवे सांगतात की, उसाची लागवड करण्याअगोदर पूर्व मशागत करून घ्यावी. नांगरणी, फण, रोटर फिरवणे व त्यानंतर सरी सोडून 86032 या उसाची लागवड केली. हा ऊस ‘ऊस संशोधन केंद्र पाडेगाव’ येथून आणला असून या उसाची व्हरायटी चांगली आहे.
advertisement
3/5
सीताराम यांनी 2024 मध्ये या उसाची लागवड केली आहे. उसाची लागवड करत असताना सरी साडेचार फूट ठेवलेली आहे. तर उसातील अंतर चांगले सोडल्याने उगवण क्षमता देखील चांगली आहे, असे ते सांगतात.
advertisement
4/5
सीताराम रणदिवे यांनी संपूर्ण ऊस शेती सेंद्रिय पद्धतीने केली आहे. सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यांनी 86032 हे उसाचे वाण निवडले. उसाची हार्वेस्टिंग 13 ते 17 महिन्यात करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी हा ऊस वरदानदायी आहे तर कारखान्यांसाठी याची रिकव्हरी चांगली आहे.
advertisement
5/5
शेतकरी व कारखानदार या दोन्हींना केंद्रबिंदू मानून ही व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीची ठरली आहे. या जातीच्या उसाचे एकरी उत्पन्न 70 ते 80 टनापर्यंत निघते. तर हीच शेती सेंद्रिय पद्धतीने केल्यास उत्पन्न 100 ते 125 टनापर्यंत निघत असल्याचेही रणदिवे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : शेतकऱ्याची कमाल, एकरी घेतलं तब्बल इतकं टन उसाचे उत्पादन, अख्खं गाव पाहत राहिलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल