TRENDING:

लागवड सोपी, खर्च कमी अन् कमाई जास्त! 'या' एका पिकामुळे शेतकरी झाला मालामाल, इतकंच नाहीतर...

Last Updated:
बाराबंकी जिल्ह्यातील भूपेंद्र कुमार यांनी पारंपरिक शेतीपेक्षा भाजीपाला शेतीत लक्ष केंद्रित केले. सध्या ते 2 बिघ्यांत वांगी लागवड करत असून, एका हंगामात 60-70 हजार रुपये नफा मिळवत आहेत. वांगी शेतीचा...
advertisement
1/6
लागवड सोपी, खर्च कमी अन् कमाई जास्त! 'या' एका पिकामुळे शेतकरी झाला मालामाल
शेतीत नफा मिळत नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी ही बातमी एक उत्तम उदाहरण आहे. गुजरातमधील बाराबंकी जिल्ह्यातील पलाहारी गावातील भूपेंद्र कुमार या शेतकऱ्याने वांग्याच्या शेतीतून तब्बल 60 ते 70 हजार रुपयांचा नफा कमावला आहे. वांग्याच्या पिकाचा कालावधी 6 ते 7 महिने असतो आणि बाजारात त्याला नेहमीच मागणी असते, त्यामुळे ही शेती शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे.
advertisement
2/6
आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी वांग्याची लागवड खूप फायदेशीर ठरत आहे. ही एक लोकप्रिय भाजी आहे, जी जवळजवळ सर्वत्र सहज पिकवता येते. वांग्याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे पीक 6 ते 7 महिने उपलब्ध असते. बाजारात त्याला वर्षभर मागणी असते. यामुळे शेतकऱ्यांना या शेतीतून सातत्याने उत्पन्न मिळू शकते. सध्या अनेक शेतकरी इतर व्यवसायांपेक्षा शेतीकडे जास्त लक्ष देत आहेत. ते वांग्यासारख्या हंगामी पिकांमधून चांगले पैसे कमवू शकतात. बाजारात मागणी स्थिर असल्यामुळे ही लागवड नेहमीच फायदेशीर ठरते.
advertisement
3/6
बाराबंकी जिल्ह्यातील पलाहारी गावातील शेतकरी भूपेंद्र कुमार यांनी इतर पिकांसोबत वांग्याची लागवड सुरू केली आणि त्यांना चांगला नफा मिळाला. आज ते सुमारे 40 गुंठ्यात वांग्याची लागवड करत आहेत. या शेतीतून त्यांना प्रति पीक सुमारे 60 ते 70 हजार रुपये नफा मिळत आहे.
advertisement
4/6
शेतकरी भूपेंद्र कुमार यांनी सांगितलं की, ते सुरुवातीला पारंपरिक पिके घेत होते, ज्यात पुरेसा नफा मिळत नव्हता. त्यानंतर त्यांनी भाजीपाला शेतीकडे लक्ष वळवलं, ज्यात त्यांनी भेंडी, टोमॅटो, वांगी आणि दूधी भोपळा यांसारखी पिके घेतली. या बदलामुळे त्यांना चांगला नफा मिळाला. सध्या त्यांच्या दोन बिघे शेतात गोल वांगी आहेत, ज्याचं वैशिष्ट्य म्हणजे बाजारात त्याला नेहमीच मागणी असते आणि त्याला चांगला भाव मिळतो.
advertisement
5/6
या शेतीच्या खर्चाबद्दल बोलायचं झाल्यास, 20 गुंठ्यांसाठी 6 ते 7 हजार रुपये खर्च येतो. तर प्रति पीक नफा सुमारे 60 ते 70 हजार रुपये असतो. पेरणीनंतर 6 ते 7 महिने हे पीक सतत मिळत राहतं. या शेतीत खर्च कमी आणि नफा जास्त आहे.
advertisement
6/6
वांग्याची लागवड कशी करावी? पहिल्यांदा वांग्याच्या बियांची नर्सरी तयार केली जाते. मग शेताची दोन-तीन वेळा खोल नांगरणी करून त्यावर शेणखत टाकलं जातं. त्यानंतर शेत सपाट करून त्यात बेड तयार केले जातात. लहान अंतरावर वांग्याची रोपे लावून लगेच पाणी दिलं जातं. फक्त दोन महिन्यांतच वांग्याची रोपे काढणीसाठी तयार होतात, जी आपण बाजारात विकू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
लागवड सोपी, खर्च कमी अन् कमाई जास्त! 'या' एका पिकामुळे शेतकरी झाला मालामाल, इतकंच नाहीतर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल