Youtube वर पाहिलं अन् ठरलं! शेतकऱ्याच्या लेकानं 3 महिन्यांत कमावले 5 लाख रुपये!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
यूट्यूबवरून माहिती घेत त्यांनी तीन एकरात कोहळ्याची लागवड केली. अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाने कोहळ्याचे पीक जोमदार आले आहे.
advertisement
1/7

सांगलीच्या आष्टा येथील प्रगतशील शेतकरी सुनील आनंदराव माने ऊस शेतीला फाटा देत फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. यूट्यूबवरून माहिती घेत त्यांनी तीन एकरात कोहळ्याची लागवड केली.
advertisement
2/7
अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाने कोहळ्याचे पीक जोमदार आले आहे. योग्यवेळी बाजारपेठ मिळाल्याने त्यांना तीन महिन्यांत तीन एकरात पाच लाखांचे उत्पन्न मिळाले.
advertisement
3/7
कृषीभूषण सुनील माने यांनी पपईचे पीक काढलेल्या तीन एकर शेतामध्ये कोहळ्याची लागवड केली. एकरी 40 हजार रुपये खर्च करून कोहळा पिकवला. रोपवाटिकेमधून कोहळ्याची रोपे त्यांनी तयार करून घेतली.
advertisement
4/7
वेलवर्गीय वनस्पती असल्याने संभाव्य रोगराई लक्षात घेऊन पिकाची काळजी घेतली. वेळोवेळी कीटकनाशके आणि बुरशीनाशके फवारली. व्यवस्थापनामुळे कोहळ्याचे पीक जोमदार आले होते.
advertisement
5/7
कमी पाणी, कमी श्रम आणि कमी कालावधीत तयार होणारे कोहळ्याचे पीक त्यांना वरदान ठरले आहे.त्यांनी त्याचे उत्तम व्यवस्थापन करून चांगली बाजारपेठही मिळवली आहे. वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करून एका कोहळ्याचे वजन 1 किलोपासून 17 किलोपर्यंत वाढल्याचे सुनील माने यांनी सांगितले.
advertisement
6/7
भरभोस उत्पादन : एकरी सुमारे 18 ते 20 टन उत्पादन मिळाले. एकरी 40 हजार रुपये खर्च आला. तीन एकर क्षेत्रातील कोहळ्यास मुंबई, वाशी आणि भिलाई येथील व्यापाऱ्यांकडून दहा ते बारा रुपये किलोला दर मिळाला. एकरी सुमारे 17 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. एकरी चाळीस हजार खर्च वजा जाता तीन एकरमधून तीन महिन्यांत पाच लाख नफा मिळाला.
advertisement
7/7
ऊस शेतीला पर्याय : ऊस शेतीला फाटा देऊन केळी आणि पपईची लागवड केली. वेगळे काहीतरी करावे या दृष्टिकोनातून कोहळा लावला. पहिल्या चार एकरमध्ये अपेक्षित दर मिळाला नाही. परंतु पुढील तीन एकरातील कोहळ्याला चांगला दर मिळाला. शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न केल्यास शेती फायदेशीर ठरत असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Youtube वर पाहिलं अन् ठरलं! शेतकऱ्याच्या लेकानं 3 महिन्यांत कमावले 5 लाख रुपये!