पपई शेती ठरली वरदान! सव्वा एकरमध्ये घेतलं 8 लाखांचं उत्पन्न, तरुण शेतकऱ्यानं कशी केली कमाल?
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी श्रीरंग श्रीकांत कुलकर्णी यांचे शिक्षण दहावी झालेले आहे. गेल्या 4 वर्षांपासून पपईची लागवड करत आहेत. त्यांना पपईच्या शेतीतून 8 लाखांचा नफा मिळाला आहे.
advertisement
1/7

'मेहनत कर फल की चिंता मत कर' ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली असाल. याचाच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज या गावातील तरुण शेतकरी श्रीरंग श्रीकांत कुलकर्णी. त्यांनी सव्वा एकर शेतात पपईची लागवड केली असून या पपईच्या विक्रीतून 10 लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
advertisement
2/7
शेतकरी श्रीरंग श्रीकांत कुलकर्णी यांचे शिक्षण दहावी झालेले आहे. गेल्या 4 वर्षांपासून पपईची लागवड करत आहेत.
advertisement
3/7
सव्वा एकरात श्रीरंग कुलकर्णी यांनी 15 नंबर असलेली पपईची लागवड केली आहे. सव्वा एकरात जवळपास 1 हजार 21 पपईच्या रोपाची लागवड केली आहे.
advertisement
4/7
पपईच्या रोपाची लागवड श्रीरंग कुलकर्णी यांनी 8 बाय 6 वर केली आहे. सव्वा एकरात शेतकरी श्रीरंग कुलकर्णी यांनी 82 टनाचे उत्पादन घेतले आहे.
advertisement
5/7
सरासरी बाजारात या पपईला 10 ते 15 रुपये प्रमाणे दर मिळाला आहे. रोप, खते, फवारणी आदी मिळून शेतकरी श्रीरंग कुलकर्णी यांना 1 लाख 80 हजार रुपये खर्च आला असून पपई विक्रीतून 10 लाख रुपये मिळाले आहे.
advertisement
6/7
खर्च वजा करुन शेतकरी श्रीरंग कुलकर्णी यांना 8 लाखांचा नफा मिळाला आहे.
advertisement
7/7
शिक्षण शिकलेल्या उच्च तरुणांनी मुंबई, पुणे या ठिकाणी नोकरीला न जाता जर शेतीकडे वळल्यात तर नक्कीच नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, असे आवाहन दहावी शिक्षण घेतलेल्या शेतकरी श्रीरंग कुलकर्णी यांनी तरुणांना केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
पपई शेती ठरली वरदान! सव्वा एकरमध्ये घेतलं 8 लाखांचं उत्पन्न, तरुण शेतकऱ्यानं कशी केली कमाल?