आंतरपिकातून दुहेरी फायदा, शेतकऱ्याला झाला 3 लाखांचा नफा, असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
अंजीर लागवडीसाठी जवळपास 70 ते 80 हजार रुपये खर्च आला आहे तर कांदा लागवडीसाठी 20 ते 30 हजार रुपये खर्च आला आहे. यामधून त्यांना 2 ते 3 लाखांचा नफा झाला आहे.
advertisement
1/7

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी या गावात प्रथमच शेतकरी महेश शिवाजी सावंत यांनी अंजीरची लागवड केली आहे. या अंजीरची लागवड करून त्यामध्ये कांद्याचा आंतरपीक घेतले आहे.
advertisement
2/7
अंजीर लागवडीसाठी जवळपास 70 ते 80 हजार रुपये खर्च आला आहे तर कांदा लागवडीसाठी 20 ते 30 हजार रुपये खर्च आला आहे. यामधून त्यांना 2 ते 3 लाखांचा नफा झाला आहे.
advertisement
3/7
महेश शिवाजी सावंत यांचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले आहे. पुण्यातील एका खाजगी कंपनीतून त्यांनी नोकरी सोडून दिली. आणि वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीवर त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला. पुरंदर येथे जाऊन अंजीर विषयी माहिती घेऊन महेश सावंत यांनी दीड एकरात अंजीरची लागवड केली असून ती बाग आठ महिन्यांची आहे.
advertisement
4/7
महेश यांनी अंजीरची लागवड दीड एकरात 18 बाय 18 वर केली आहे. तसेच अंजीरच्या बागाला जास्त पाणी लागत नाही. अंजीरची बाग लागवडीसाठी मुरमाळ आणि खडखाड जमिनीची आवश्यकता असते. कारण काळ्या जमिनीवर अंजीरची बाग येत नाही कारण पाणी जर साचत असेल तर अंजीरच्या बागेला पाणी चालत नाही. अंजीरवर पावसाळ्यात तांबेरा नावाचा रोग येतो पण तो रोग फवारणी करून आटोक्यात आणू शकतो.
advertisement
5/7
अंजीरला सध्या पुणे आणि मुंबईमध्ये 70 ते 80 रुपये किलो दर मिळत आहे. सध्या बाजारात अंजीरला मागणी खूप आहे पण उत्पादन कमी आहे. अंजीरची लागवड एकदा केल्यास 25 वर्ष पर्यंत उत्पादन घेऊ शकतो. महेश सावंत यांनी पुन्हा अंजीर या व्हरायटीच्या अंजीरची लागवड केली आहे. तसेच या पुन्हा अंजीरवर प्रक्रिया करून अंजीर जॅम, अंजीर चॉकलेट अंजीर पासून विविध प्रोडक्शन आपण करू शकतो.
advertisement
6/7
अंजीरची लागवड करण्यासाठी महेश यांना 70 ते 80 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. तर या अंजीरच्या बागेत आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड करून त्यांनी अंजीर बागेचा खर्च तसेच कांदा लागवडीचा खर्च वजा करून 2 ते 3 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न घेतले आहे.
advertisement
7/7
तर अंजीर विक्रीच्या माध्यमातून शेतकरी महेश सावंत यांना लाखो रुपयांचा नफा मिळणार असल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता ज्यांच्याजवळ मुबलक शेती आहे. त्या तरुणांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करून शेती करावी आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला महेश सावंत यांनी दिला आहे.