लोकांनी चेष्टा केली, हाल सोसले! 30 वर्षांनी शनिदेवाची कृपा, या राशींचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा न्यायाचा कारक मानला जातो. शनि एका राशीत साधारण अडीच वर्षे वास्तव्य करतो आणि पुन्हा त्याच राशीत यायला सुमारे ३० वर्षांचा कालावधी लागतो.
advertisement
1/5

<strong>मुंबई :</strong> वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा न्यायाचा कारक मानला जातो. शनि एका राशीत साधारण अडीच वर्षे वास्तव्य करतो आणि पुन्हा त्याच राशीत यायला सुमारे ३० वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनि मीन राशीत वक्री स्थितीत आहे. तर मंगळ तूळ राशीत भ्रमण करत आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी शनि आणि मंगळ यांच्यात १५० अंशांचे अंतर होऊन षडाष्टक योग तयार होत आहे. या योगामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार असून काहींना आव्हानेही सामोरी जावी लागतील.
advertisement
2/5
<strong>मीन राशी - </strong> शनि वक्री आणि मंगळ आठव्या घरात असल्याने मीन राशीच्या जातकांसाठी ही अनुकूल वेळ मानली जाते. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात तसेच बदलाचा विचार करत असल्यास यश मिळू शकते. व्यवसायातील तोट्यातून दिलासा मिळेल आणि नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा संभवतो. अनावश्यक खर्च कमी होईल. वैवाहिक जीवनात कटुता कमी होऊन सौहार्द वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पचनाच्या समस्या कमी होतील.
advertisement
3/5
<strong>मेष राशी - </strong> मेष राशीच्या जातकांसाठी शनि-मंगळाचा षडाष्टक योग लाभदायी ठरेल. मंगळाची दृष्टी धन भावावर असल्यामुळे अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. करिअर आणि नशिबात प्रगती होईल. दीर्घकाळाचा दबाव कमी होऊन यशाचे दरवाजे उघडतील. व्यावसायिक क्षेत्रात स्पर्धकांना जोरदार टक्कर देता येईल. जीवनात सकारात्मकता वाढेल. वैवाहिक जीवनात सौख्य येईल आणि जुन्या समस्या मिटतील.
advertisement
4/5
<strong>मिथुन राशी - </strong> मिथुन राशीसाठी हा काळ परिश्रमाचे फळ देणारा असेल. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. गुरु ग्रहाच्या दशेमुळे उत्पन्नात बदल जाणवतील पण शनि-मंगळाच्या योगामुळे कामात प्रगतीची संधी मिळेल. मेहनतीमुळे वरिष्ठांची दाद मिळू शकते.
advertisement
5/5
एकूणच, शनि वक्री असल्यामुळे जातकांना संयम, शिस्त आणि मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. मात्र मंगळाशी होणाऱ्या षडाष्टक योगामुळे अचानक घडणाऱ्या घटनांची शक्यता वाढेल. काही राशींना आर्थिक लाभ, तर काहींना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. आरोग्य आणि नातेसंबंधातही सकारात्मक बदल दिसून येतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
लोकांनी चेष्टा केली, हाल सोसले! 30 वर्षांनी शनिदेवाची कृपा, या राशींचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार