TRENDING:

'माझ्यासोबत लग्न कर, पैसे देईन', रेणुका शहाणेंकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी, आईही झाली शॉक

Last Updated:
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्याबरोबर घडलेला एक धक्कादायक प्रकार उघड केला. एका प्रोड्यूसरने त्यांच्या घरी येऊन त्यांच्या आईसमोर एक विचित्र मागणी केली होती.
advertisement
1/7
'माझ्यासोबत लग्न कर, पैसे देईन', रेणुकाकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी
मराठीच नाही हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री रेणुक शहाणे. आपल्या सालस, सुंदर अभिनयाने रेणुका यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. रेणुका यांनी अनेक हिंदी सिनेमात काम केलं आहे. अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांबरोबर तिने काम केलं आहे.
advertisement
2/7
पण एकदा एक निर्माता त्यांच्या घरी आणि तिला धक्काच बसला. तो जे काही बोलला हे ऐकून रेणुका आणि त्यांची आश्चर्यचकीत झाली. त्या निर्मात्याने रेणुकाला नको ती ऑफर देऊ केली होती.
advertisement
3/7
झूमला दिलेल्या मुलाखतीत रेणुका यांनी त्यांच्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगाचा खुलासा केला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना फिल्म इंडस्ट्रीतील गैरवर्तनाचा अनुभव सांगितला. एक निर्माता त्यांच्या घरी आला आणि धक्कादायक मागणी केल्याचं तिनं सांगितलं.
advertisement
4/7
रेणुका म्हणाल्या, "खूप वर्षांपूर्वी एक निर्माता माझ्या घरी आला होता. त्याने मला सांगितलं, मी विवाहित आहे, पण तू माझ्यासोबत राहा. तू माझ्या ब्रँडची अॅम्बेसेडर हो. मी तुला दर महिन्याला स्टायपेंड देईन."
advertisement
5/7
"हे ऐकून मी आणि माझी आई दोघीही थक्क झालो. त्या घटनेनंतर मी ते कॅम्पेन न करण्याचा निर्णय घेतला."
advertisement
6/7
रेणुका यांनी पुढे सांगितलं, "अशा परिस्थितीत कलाकारांकडे दोनच पर्याय असतात. गप्प राहायचं किंवा काम सोडून द्यायचं. जर तुम्ही विरोध केला तर तुम्हाला प्रोजेक्टमधून बाहेर काढलं जातं. बऱ्याचदा पैसे दिले जात नाहीत. उलट पीडितेलाच दोष दिला जातो. एक ग्रुप असतो जो अशा लोकांना प्रोटेक्शन देत असतो."
advertisement
7/7
रेणुका शहाणे यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांचा 'उत्तर' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी त्या महेश मांजरेकर यांच्या 'देवमाणूस' या मराठी सिनेमात दिसल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्यासोबत लग्न कर, पैसे देईन', रेणुका शहाणेंकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी, आईही झाली शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल