त्रिग्रही योग आला! 50 वर्षांनी या राशींवरील संकट दूर होणार, मान सन्मान, पैशांसह जीवनात आनंद नांदणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Tirgrahi Yoga In Leo : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, धन, ऐश्वर्य आणि सुखाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश केला आहे. सध्या या राशीत आधीच सूर्य व केतू उपस्थित आहेत. त्यामुळे सिंह राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे.
advertisement
1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, धन, ऐश्वर्य आणि सुखाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश केला आहे. सध्या या राशीत आधीच सूर्य व केतू उपस्थित आहेत. त्यामुळे सिंह राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. या विशेष योगामुळे काही राशींसाठी भाग्याचा दरवाजा खुला होऊ शकतो. अचानक धनलाभ, अडकलेली कामे पूर्ण होणे, करिअरमध्ये प्रगती आणि सामाजिक सन्मान वाढण्याची संधी मिळणार आहे. पाहूया कोणत्या राशींना या शुभ योगाचा सर्वाधिक फायदा होईल.
advertisement
2/5
<strong>धनु राशी -</strong> धनु राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण नवव्या घरात सूर्य, शुक्र आणि केतूची युती होत आहे. त्यामुळे नशिबाची साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. व्यवसाय किंवा नोकरीसाठी प्रवास होऊ शकतो आणि तो लाभदायक ठरेल. अडकलेली कामे पूर्ण होतील तसेच व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न राहील. या काळात धनु राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे, तर व्यवसायात नवीन करार मिळू शकतात. सोशल नेटवर्किंगमुळे नवे मित्र जोडले जातील, ज्यामुळे तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि कामाचे योग्य मूल्यमापन होईल.
advertisement
3/5
<strong>कर्क राशी - </strong> कर्क राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग धनभावात तयार होणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वाणीचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील तसेच वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे आणि व्यावसायिकांना यश मिळेल. विशेषतः मार्केटिंग, मीडिया, भाषणकला, लेखन, बँकिंग किंवा कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. या काळात समाजात तुमचा सन्मान वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण येईल आणि नवीन संधी उपलब्ध होतील.
advertisement
4/5
<strong>वृश्चिक राशी - </strong> वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल आणि वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील, तर व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. या काळात सामाजिक वर्तुळ वाढेल, नवीन लोकांशी संपर्क होईल आणि त्याचा थेट फायदा करिअरला मिळेल. तुमचा सन्मान आणि आदर वाढेल. व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य वाढेल आणि करिअरमध्ये नवे मार्ग खुलतील.
advertisement
5/5
दरम्यान या त्रिग्रही योगामुळे धनु, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना करिअर, व्यवसाय, नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीत मोठा लाभ होईल. नशिबाची साथ मिळाल्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील आणि प्रगतीचा मार्ग सुकर होईल. हा काळ त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे.<strong> (सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
त्रिग्रही योग आला! 50 वर्षांनी या राशींवरील संकट दूर होणार, मान सन्मान, पैशांसह जीवनात आनंद नांदणार