Netflix Trending Movies : नेटफ्लिक्सवर ट्रेंड होतायत हे 10 मूव्ही; चौथा पार्टनसरसोबतच पाहा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Netflix Top 10 Trending Movies : नेटफ्लिक्सवर सध्या अॅक्शन, थ्रिलर, कॉमेडी आणि अॅनिमेशन अशा विविध जॉनरचे 10 चित्रपट सध्या ट्रेंड करत आहेत.
advertisement
1/10

बारामूला : काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आधारित 'बारामूला' हा थ्रिलर चित्रपट आपल्या कथानक आणि सिनेमॅटोग्राफीमुळे चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर आज हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. आरिफ मिर्झा दिग्दर्शित या चित्रपटात इमाद शाह आणि सयानी गुप्ता प्रमुख भूमिकेत आहेत.
advertisement
2/10
इडली कढाई : साऊथचे कौटुंबिक नातेसंबंध आणि मजेशीर प्रसंगांनी भरलेला 'इडली कढाई' हा हलकाफुलका चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रविवारी हा नेटफ्लिक्सवरील दुसऱ्या क्रमांकाचा ट्रेंडिंग चित्रपट आहे. कार्तिक सुब्बाराज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
advertisement
3/10
फ्रेंकेंस्टाइन : क्लासिक हॉररला आधुनिक स्पर्श देणारा 'फ्रेंकेस्टाइन' हा चित्रपट विज्ञान आणि थरार यांचा उत्कृष्ट संगम आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. मार्क रोमनॅक यांच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनलेल्या या चित्रपटात किलियन मर्फी आणि एमा मॅकी प्रमुख भूमिकेत आहेत.
advertisement
4/10
एक चतुर नार : रोमँटिक, कॉमेडी आणि जुनं बॉलिवूड संगीत यांच्या सुंदर मिश्रणाने सजलेला 'एक चतुर नार' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या हा नेटफ्लिक्सवर चौथ्या स्थानावर आहे. राज मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली तापसी पन्नू आणि राजकुमार राव यांची जोडी कमाल करत आहे.
advertisement
5/10
दे कॉल मी ओजी : अॅक्शन आणि स्टाईलने भरलेला 'दे कॉल मी ओजी' हा तेलुगु गँगस्टर चित्रपट चाहत्यांमध्ये हिट ठरला आहे. सध्या हा नेटफ्लिक्सवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. या चित्रपटात पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे आणि सुवीक सागर रेड्डी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
advertisement
6/10
चक दे इंडिया : शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' हा क्लासिक क्रीडा चित्रपट अनेक वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत क्रमांक 6 वर आहे. शिमित अमीन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट महिला हॉकी संघाची प्रेरणादायक कहाणी दाखवतो.
advertisement
7/10
वश लेवल 2 : भीती आणि सुपरनॅचरल घटनांनी भरलेला 'वश लेवल 2' हा गुजराती चित्रपट आपल्या थरारक कथानकामुळे चर्चेत आहे. सध्या हा चित्रपट क्रमांक 7 वर ट्रेंड होत आहे. हेमांग शाह यांच्या दिग्दर्शनाखाली जतिन सारथी आणि हेली शाह यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
advertisement
8/10
डेस्पिकेबल मी 4 : मिनियन्सच्या खोडकर मस्तीने आणि ग्रूच्या खट्याळपणाने भरलेला 'डेस्पिकेबल मी 4' हा अॅनिमेटेड चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. नेटफ्लिक्सच्या यादीत हा चित्रपट क्रमांक 8 वर ट्रेंड होत आहे. चित्रपटात स्टीव्ह कॅरेल, क्रिस्टन विग आणि विल फेरेल यांच्या आवाजांचा समावेश आहे.
advertisement
9/10
महावतार नरसिम्हा : भगवान विष्णूंच्या दहा अवतारांच्या कथांवर आधारित 'महावतार नरसिम्हा' हा अॅनिमेटेड चित्रपट धार्मिक विषय आणि आधुनिक अॅनिमेशन यांचा सुंदर संगम आहे. नेटफ्लिक्सवर हा क्रमांक 9 वर ट्रेंड होत आहे.
advertisement
10/10
ग्रेटर कलेश : 'ग्रेटर कलेश' हा चित्रपट कौटुंबिक नाट्य प्रकारातील आहे. ज्यात एहसास चन्ना ट्विंकल हैंडाची भूमिका साकारते, जी दिवाळीच्या सणात घरी परतते आणि कुटुंबातील लपलेल्या तणावांशी आणि नात्यांच्या गुंतागुंतीशी सामना करते. हा चित्रपट क्रमांक 10 वर ट्रेंड करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Netflix Trending Movies : नेटफ्लिक्सवर ट्रेंड होतायत हे 10 मूव्ही; चौथा पार्टनसरसोबतच पाहा