आज 17 नोव्हेंबरचा नवपंचम योग 4 राशींचे नशीब पालटणार, धनलाभ होण्यास सुरुवात होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Navpancham Yog 2025 : वैदिक ज्योतिषानुसार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी एक अत्यंत शुभ आणि प्रभावी ग्रहसंयोग घडणार आहे. उद्या सूर्य आणि गुरु ग्रह एकमेकांच्या नेमक्या 120 अंश अंतरावर येणार असून या संयोगामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल.
advertisement
1/6

वैदिक ज्योतिषानुसार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी एक अत्यंत शुभ आणि प्रभावी ग्रहसंयोग घडणार आहे. आज सूर्य आणि गुरु ग्रह एकमेकांच्या नेमक्या 120 अंश अंतरावर येणार असून या संयोगामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. द्रिक पंचांगानुसार, हा अचूक संयोग सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी तयार होणार आहे. या दोन शुभ ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, भाग्य, धर्म आणि प्रगतीचा कारक मानले जाते. तर सूर्याला आत्मविश्वास, नेतृत्व, शक्ती आणि यशाचा कारक ग्रह मानले जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकमेकांशी अनुकूल कोनात येतात, तेव्हा जीवनात सकारात्मक घडामोडी सुरू होतात. उद्या तयार होणारा नवपंचम योग चार राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल, असा अंदाज ज्योतिषतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या राशींमध्ये आर्थिक लाभ, मान-सन्मान, प्रगती, शुभवार्ता आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. कोणत्या राशींना याचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे? ते पाहूया.
advertisement
3/6
मकर राशी - सूर्य आणि गुरुच्या नवपंचम योगामुळे मकर राशीतील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या महत्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी सुरू केलेल्या कामांचे फळ मिळू शकते. नवी नोकरी, व्यवसाय किंवा गुंतवणुकीबाबत शुभ संकेत दिसतील. घरातील वातावरणही आनंदी राहील. मात्र खर्च काही प्रमाणात वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असेल.
advertisement
4/6
वृषभ राशी - या संयोगाचा प्रभाव वृषभ राशीच्या व्यक्तींना नवीन ऊर्जा आणि उत्साह देणार आहे. प्रेमसंबंध मजबूत होतील. जोडीदाराबरोबरचे तणाव दूर होऊन नात्यात सौहार्द निर्माण होईल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायामुळे प्रवास घडू शकतो आणि हा प्रवास यशदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होऊन नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांसाठी हा नवपंचम योग अत्यंत शुभ असेल. या काळात अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. शासनाच्या एखाद्या योजनेचा लाभ मिळण्याचे संकेत आहेत. नशिबाची साथ लाभल्याने अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील आणि मन प्रसन्न राहील.
advertisement
6/6
मीन राशी - मीन राशीच्या व्यक्तींना नवपंचम योग विशेष फलदायी ठरेल. जुन्या ओळखी आणि मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा उंचावेल. दिवसाच्या शेवटी आनंद देणारी एखादी शुभवार्ता मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचीही चिन्हे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज 17 नोव्हेंबरचा नवपंचम योग 4 राशींचे नशीब पालटणार, धनलाभ होण्यास सुरुवात होणार