भद्र राजयोग येणार! पुढच्या 5 दिवसांत या राशींचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार, प्रसिद्धीसह मान सन्मान मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंच महापुरुष योगांमध्ये भद्र योग हा अत्यंत शुभ आणि सामर्थ्यशाली योग मानला जातो. हा योग बुध ग्रहाच्या प्रभावाखाली घडतो आणि जेव्हा बुध आपल्याच उच्च राशीत प्रवेश करतो.
advertisement
1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंच महापुरुष योगांमध्ये भद्र योग हा अत्यंत शुभ आणि सामर्थ्यशाली योग मानला जातो. हा योग बुध ग्रहाच्या प्रभावाखाली घडतो आणि जेव्हा बुध आपल्याच उच्च राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा परिणाम अनेक राशींवर विलक्षण सकारात्मक पद्धतीने दिसतो. बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणीतील गोडवा, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक मान-सन्मानाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या काळात तयार होणाऱ्या भद्र योगामुळे काही राशींचं भाग्य उजळणार असल्याचं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.
advertisement
2/5
या वर्षी बुध कन्या राशीत आपल्या उच्च स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे भद्र राजयोगाची निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे 21 सप्टेंबर 2025 रोजी कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे. या दोन घटनांचा संगम काही राशींच्या जीवनात अनपेक्षित बदल घडवणार असून त्यातून मोठे फायदे मिळतील, असे मत ज्योतिष तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
advertisement
3/5
<strong>मिथुन - </strong> भद्र योग मिथुन राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे. या काळात तुमचं उत्पन्न झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान, ओळख आणि प्रतिष्ठा मिळेल. विशेषतः पत्रकारिता, मीडिया, लेखन, कम्युनिकेशन, राजकारण यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रचंड यश मिळू शकतं. बुद्धिमत्ता आणि वक्तृत्वामुळे लोक प्रभावित होतील. नवीन वाहन खरेदीचा योग जुळू शकतो.
advertisement
4/5
<strong>कन्या - </strong> कन्या राशीतील लोकांसाठी हा काळ खास लाभदायी आहे. बुध स्वतःच्या उच्च राशीत असल्याने करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. शासकीय सेवेत जाण्याची इच्छा असलेल्या तरुणांना यशाची संधी आहे. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यातदेखील भाग्याची साथ राहील. व्यक्तिमत्त्वात आकर्षक बदल जाणवतील आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
5/5
<strong>धनू -</strong> भद्र योग धनू राशीच्या लोकांसाठी नवी दारे उघडणारा ठरणार आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या आणि प्रमोशनचे संकेत आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं. प्रोफेशनल ग्रोथमध्ये झपाट्याने प्रगती होऊन करिअरमध्ये उच्च स्थान मिळवण्याची संधी उपलब्ध होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
भद्र राजयोग येणार! पुढच्या 5 दिवसांत या राशींचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार, प्रसिद्धीसह मान सन्मान मिळणार