TRENDING:

वर्षाच्या शेवटी योग्य वेळी आली! रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी तयार झालाय जबरदस्त योग, या राशींचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार

Last Updated:
Astrology News :  वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. आत्मबल, आत्मविश्वास, पिता, सत्तास्थान, मान-सन्मान आणि नेतृत्वगुणांचा तो प्रमुख कारक आहे.
advertisement
1/6
तब्बल 17 वर्षांनी आलाय जबरदस्त योग, या राशींचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. आत्मबल, आत्मविश्वास, पिता, सत्तास्थान, मान-सन्मान आणि नेतृत्वगुणांचा तो प्रमुख कारक आहे. सूर्य ठराविक कालावधीनंतर राशीपरिवर्तन करतो आणि प्रत्येक वेळी त्याचा परिणाम मानवी जीवनावर वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतो. सध्या सूर्य धनु राशीत भ्रमण करत असून, या राशीत तो मंगळ आणि शुक्र ग्रहांसोबत युती साधणार आहे. या ग्रहयोगांमुळे येत्या काळात अनेक प्रभावी राजयोग तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
2/6
याच पार्श्वभूमीवर 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी सूर्य ग्रहाचा यम ग्रहासोबत विशेष संयोग झाला. सूर्य आणि यम हे एकमेकांपासून अचूक 30 अंशावर आले असून, यामुळे ‘द्विद्वादश योग’ निर्माण झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग तब्बल 17 वर्षांनंतर घडत आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. हा दुर्मीळ योग काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे ज्योतिषांचे मत आहे. आर्थिक, व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.
advertisement
3/6
मेष रास - मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात भाग्याची चांगली साथ मिळेल. रखडलेली कामे पुन्हा गती घेतील आणि आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. वर्षाच्या अखेरीस मित्रपरिवार किंवा जोडीदारासोबत सहलीचा आनंद घेण्याची संधी मिळू शकते. मानसिक तणाव कमी होऊन आनंदी वातावरण निर्माण होईल.
advertisement
4/6
धनु रास - सूर्य सध्या धनु राशीच्या लग्न भावात विराजमान असून, यम ग्रह दुसऱ्या भावात प्रभाव टाकत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभाचे संकेत मिळत आहेत. उत्पन्नाच्या नव्या स्रोतांची शक्यता निर्माण होईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊन सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी विस्ताराचे योग असून, नवीन भागीदारी किंवा करार फायदेशीर ठरू शकतात. वैवाहिक जीवनात समंजसपणा आणि प्रेम टिकून राहील. जोडीदारासोबत प्रवास किंवा एखादी खास योजना आखली जाऊ शकते.
advertisement
5/6
वृश्चिक रास - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य-यम द्विद्वादश योग विशेष फलदायी ठरणार आहे. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असून, पूर्वी रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. समाजकार्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि मान-सन्मानात वाढ होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. या काळात दानधर्म आणि पुण्यकर्म केल्यास सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता अधिक आहे.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
वर्षाच्या शेवटी योग्य वेळी आली! रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी तयार झालाय जबरदस्त योग, या राशींचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल