TRENDING:

Weather Alert: हाडं गोठवणारी थंडी! कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, आज कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 24 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5
हाडं गोठवणारी थंडी! कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, आज कसं असेल हवामान?
महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असून काही भागात पारा घसरला आहे. मुंबई-ठाण्यात देखील तापमानात मोठी घट झाली असून सकाळी आणि संध्याकाळी गारठा जाणवत आहे. कल्याण-डोंबिवलीत देखील तापमानात मोठी घट झाली आहे. 24 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात 24 डिसेंबर रोजी थंडीची लाट कायम राहणार आहे. किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसा ऊन असले तरी, सकाळी आणि रात्री हवामान थंड जाणवेल. शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
advertisement
3/5
डोंबिवली शहरात मंगळवारच्या तुलनेत तापमानात वाढ झाली आहे. 24 डिसेंबरला किमान तापमानात 16 अंश, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळी हवामान कोरडे आणि थंड राहील. तर दिवसा उकाडा जाणवेल. दिवसा ऊबदारपणा जाणवेल तर पुन्हा आज सकाळी आणि रात्री थंडी अनुभवायला मिळेल.
advertisement
4/5
ईशान्येकडील वारे वाहू लागल्याने कल्याण डोंबिवली ग्रामीण भागात थंडीची तीव्रता वाढेल. आज 24 डिसेंबरला ग्रामीण भागात हवामान थंड आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. ग्रामीण भागात थंडीचा कडाका जाणवेल.
advertisement
5/5
बदलापूर शहराच्या तापमानात मंगळवार पेक्षा घट झाल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 12 अंश तर कमाल 24 अंश सेल्सिअस असेल. मुरबाड शहापूर तालुक्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 13 अंश आणि कमाल 33 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे हवेत गारठा वाढणार असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: हाडं गोठवणारी थंडी! कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, आज कसं असेल हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल