अखेर वेळ आलीच! आज शनि सूर्याचा जबरदस्त योगामुळे या राशींची श्रीमंतीकडे होणार वाटचाल
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार 29 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण आज तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनि या दोन शक्तिशाली ग्रहांचा दुर्मिळ ‘त्रिदशंक योग’ तयार होत आहे.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रानुसार 29 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण आज तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनि या दोन शक्तिशाली ग्रहांचा दुर्मिळ ‘त्रिदशंक योग’ तयार होत आहे. सूर्य हा आत्मा, तेज आणि अधिकाराचा कारक मानला जातो, तर शनि हा कर्माचा न्यायाधीश आणि शिस्तीचा ग्रह. हे दोन्ही विरोधी ग्रह एकत्र येत असले तरी 108 अंशांच्या विशेष स्थितीत तयार होणारी ही युती काही राशींना चांगले यश, प्रगती आणि आर्थिक लाभ देऊ शकते. या योगाचा शुभ परिणाम तीन विशिष्ट राशींवर होणार असून त्यांना जीवनातील अनेक क्षेत्रात अनपेक्षित बदल आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
पंचांगानुसार, सूर्य आणि शनि 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8:52 वाजता 108 अंशांच्या कोनात एकत्र येतात. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, सूर्य व शनि जरी परस्पर विरोधी ग्रह असले तरी या कोनातील त्यांची ऊर्जा स्थिर होत असल्याने सकारात्मक परिणाम वाढतो. या ऊर्जेमुळे काही व्यक्तींना करिअर, आरोग्य, धनलाभ, मान-सन्मान आणि नाती या सर्व क्षेत्रांत लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
सिंह - सूर्य हा सिंह राशीचा स्वामी असल्याने या योगाचा प्रभाव या राशीवर दुप्पट शुभ मानला जातो. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल .थांबलेले प्रकल्प पुन्हा गती घेतील. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि गुंतवणुकीत चांगला फायदा होईल. हा काळ सिंह राशीतील लोकांसाठी स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा आणि नेतृत्व सिद्ध करण्याचा आहे.
advertisement
4/6
मकर - या राशीचा अधिपती शनि असल्याने ही युती मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कष्टाचे फळ मिळेल तसेच जुन्या मेहनतीचे आता चांगले परिणाम दिसतील. नोकरीत लाभ होईल पदोन्नती, महत्त्वाची जबाबदारी किंवा पगारवाढ मिळू शकते. तसेच नवे करार आणि गुंतवणुकीतून फायदा. थकलेले पैसे मिळण्याची शक्यता वाढेल.
advertisement
5/6
कुंभ - कुंभ राशीवरही शनीचे अधिपत्य असल्याने या योगाचा प्रभाव या राशीवर अत्यंत शुभकाळ घेऊन येईल. विशेषतः आयटी, संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी भरारी घ्याल. विदेशात जाण्याची किंवा तिथून लाभ मिळण्याची शक्यता. महत्त्वाच्या लोकांशी संबंध प्रस्थापित होतील.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अखेर वेळ आलीच! आज शनि सूर्याचा जबरदस्त योगामुळे या राशींची श्रीमंतीकडे होणार वाटचाल