Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशींसाठी रविवार खास, पैसा, प्रतिष्ठा मिळेल, पण ती चूक नको, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: मेष ते मीन 12 राशींसाठी आजचा रविवार खास असेल. प्रेम, विवाह, पैसा याचे चांगले योग आज येतील. तर काहींना मात्र किरकोळ चुका भोवतील. आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेष-परिवारातील ज्येष्ठ आज आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. विवाहित जीवनात आज आनंद मिळेल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. आजचा दिवस एकंदरीत तुम्हाला आनंदी जाईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी -आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराब ही होईल. आज तुमचा शुभ अंक हा 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन- आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हा ही रिकामा वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा. असे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल. आज साठी तुमचा शुभ अंक हा 5 असणार आहे.
advertisement
4/13
कर्क राशी - आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल.विवाही जीवनात आज आनंदाची वार्ता लाभेल हातात घेतलेली कामे पूर्ण करण्याची ताकद ठेवा. आजचा अंक 2 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी -पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. अचानक धन प्राप्तीचा योग आहे. जुने मित्र भेटतील. कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. एकंदरीत आजचा दिवस तुमचा शुभ आहे. प्रवास करणार असाल तर तो आज टाळा. तुमचा दिवस शुभ जाईल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी आहे.
advertisement
6/13
कन्या राशी - संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे अविवाहित लोकांसाठी आज चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
7/13
तूळ राशी -प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते. तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी -आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच तुम्हाला फायदेशीर होणार आहेत. आज तुमच्या जवळील व्यक्तीसमोर तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. आज तुम्ही रिकामा वेळ वाया घालू नका. याने तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा हा आहे.
advertisement
9/13
धनु - आज तुमच्या सोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्या करता आज कोणासोबत जास्तीचे बोलणे टाळा. जवळील व्यक्ती आज तुमच्या पासून दुखावू शकतात. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात. आज तुमच्यासाठी 6 हा अंक लाभ देणार असणार आहे. तर गुलाबी हा रंग परिधान केल्याने कामे मार्गी लागतील.
advertisement
10/13
मकर - अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. स्वतःसाठी उत्तम वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमच्यासाठी शुभ रंग हा गुलाबी असणार आहे तर शुभ अंक 6 असणार.
advertisement
11/13
कुंभ राशी - अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकारक्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी - आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशींसाठी रविवार खास, पैसा, प्रतिष्ठा मिळेल, पण ती चूक नको, आजचं राशीभविष्य