April Lucky Horoscope: धडाधड गुडन्यूज! खरा ठरणार अंदाज; या 4 राशींचे नशीब एप्रिलमध्येच पालटण्याचे योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
April Horoscope 2026: गुढीपाडवा झाला तरी काही राशींना नशीबाची साथ मिळालेली नसली तरी आता एप्रिलच्या सुरुवातीला काही राशींना धडाधड गुडन्यूज मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात, सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांसारख्या जवळजवळ सर्व प्रमुख ग्रहांचे राशी परिवर्तन होण्याची नांदी ठरणार आहे.
advertisement
1/6

ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा धमाका काही राशीं अत्यंत शुभ परिणाम होईल. राशीचक्रातील एकूण 4 राशीच्या लोकांचे भाग्य जबरदस्त उजळेल. पैसा-पैसा करण्याची वेळ जी आली होती ती आता बदलणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात लक्षणीय नफा मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. या भाग्यवान राशींबद्दल अधिक जाणून घेऊया.
advertisement
2/6
मेष - एप्रिल महिना मेष राशीसाठी एक अद्भुत महिना ठरेल. मेषच्या लोकांचे करिअर नवीन उंची गाठेल. या महिन्यात बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न कुठून कसे येईल, पण वाढेल नक्की.
advertisement
3/6
मेष राशीला साडेसाती सुरू असली तरी या महिन्यात परिस्थिती चांगली असेल, हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी गुंतवणुकीसाठी जबरदस्त असेल. व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
मिथुन - एप्रिल महिना मिथुन राशीसाठी सुवर्णकाळ ठरेल. युद्धाची पार्श्वभूमी असतानाही विदेशी व्यापारात यश मिळेल. खात्यावरचा बँक बॅलन्स वाढलेला पाहून समाधान मिळेल. मिथुनेचे लोक डोक्यावरील जुन्या कर्जातून मुक्त होतील. या महिन्यात घेतलेले निर्णय शहाणपणाचे ठरतील.
advertisement
5/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात करिअरमध्ये लक्षणीय फायदा होईल. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली भरभक्कम होईल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या बॉसकडून प्रशंसा मिळेल. जमिनीसंबंधीच्या बाबींमध्ये फायदा होईल. कधीपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. परदेशातून नोकरीची संधी येऊ शकते.
advertisement
6/6
तूळ - एप्रिल महिना तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असेल. डोकेदुखी ठरणाऱ्या अडचणी सुटतील. बऱ्याच दिवसांनी काही चांगली बातमी मिळू शकते. इनकममध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या महिन्यात, तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सुरू असलेला तुमचा व्यवसाय वाढवाल. तूळ राशीच्या लोकांना आता न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळणे अपेक्षित आहे. नोकरी करणारे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
April Lucky Horoscope: धडाधड गुडन्यूज! खरा ठरणार अंदाज; या 4 राशींचे नशीब एप्रिलमध्येच पालटण्याचे योग