TRENDING:

Astrology: 37 दिवसांचा अत्यंत खडतर काळ! या राशींच्या जीवनात वाईट प्रसंग; शनिअस्त धोक्याचा

Last Updated:
Shani Ast 2025: ज्योतिषशास्त्रात, शनि हा सर्वात शक्तिशाली आणि क्रूर ग्रह मानला जातो. शनि हा एकमेव ग्रह आहे ज्यामुळे साडेसाती मागे लागते. कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी शनी साडेसातीचा सामना करावा लागतो. शनि हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा परिस्थितीत शनीच्या स्थितीत होणारा बदल निश्चितच प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतो.
advertisement
1/6
37 दिवसांचा अत्यंत खडतर काळ! या राशींच्या जीवनात वाईट प्रसंग; शनिअस्त धोक्याचा
फेब्रुवारीच्या अखेरीस शनि अस्त होणार आहे. कुंभ राशीत तो अस्ताला जाईल आणि मीन राशीत उदय होईल. शनी अस्त झाल्यामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शनी अस्तामध्ये कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागते, त्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/6
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 07:01 वाजता कुंभ राशीत अस्ताला जाईल आणि 37 दिवस अस्त स्थितीत राहील. 06 एप्रिल 2025 रोजी त्याचा उदय होईल. शनी 26 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करेल.
advertisement
3/6
मेष - या राशीत शनि अकराव्या घरात अस्त करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. उत्पन्नात घट होईल. शहाणपणाने खर्च करा.
advertisement
4/6
मेष - शेअर बाजारात किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते अजिबात करू नका. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कामात काही अडथळे येऊ शकतात. यासोबतच नोकरीतही अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा.
advertisement
5/6
सिंह - या राशीच्या लोकांनी थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांचे उत्पन्न कमी होऊ शकते. अचानक वाढलेल्या खर्चामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. तुम्हाला कर्जही घ्यावे लागू शकते. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल. आयुष्यात काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करत असताना काहीतरी वाईट घडू शकते. म्हणून, कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. यासोबतच वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणून थोडे सावधगिरी बाळगा, कारण तुमचा अहंकार तुमचे नाते तोडू शकतो.
advertisement
6/6
मकर - मकर राशीच्या लोकांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. कामात काही अडथळे येऊ शकतात. एखाद्या गोष्टीमुळे मानसिक ताण येऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. तुमच्या आरोग्याबद्दल थोडे सावधगिरी बाळगा, काही जुना आजार पुन्हा डोके वर काढू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: 37 दिवसांचा अत्यंत खडतर काळ! या राशींच्या जीवनात वाईट प्रसंग; शनिअस्त धोक्याचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल