Astrology: सगळीकडून फक्त निराशा! आता शुक्र तुमच्या राशीच्या भाग्याचे दार उघडेल, पडझड थांबणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Astrology: राशीचक्रातील कोणती रास कधी चमकेल, याचा अंदाज ज्योतिषशास्त्र वर्तवते. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शुक्र हा विलास, भौतिक सुख, वैवाहिक आनंद, संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये शुक्र ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
advertisement
1/5

मुळात शुक्र हा धनाशी संबंधित असलेला ग्रह आहे, तो जवळपास वर्षांनी त्याच्या उच्च राशीत प्रवेश करतोय, या बदलामुळे काही राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडून येतील, करिअरमध्ये प्रगतीचे योग निर्माण होतील. राशीचक्रावर शुक्राच्या स्थितीचा कसा परिणाम होईल ते पाहु.
advertisement
2/5
मीन - धनाचा दाता मानला जाणारा शुक्र मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान ठरेल. शुक्र तुमच्या गोचर कुंडलीतील लग्न भावातून भ्रमण करणार आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कौटुंबिक नातेसंबंध अधिक मधूर होतील आणि जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होईल.
advertisement
3/5
साडेसातीत असतानाही मीन राशीच्या लोकांची समाजात प्रतिमा उंचावेल आणि नवीन लोकांशी झालेले संपर्क भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. तसेच भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना या काळात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर फायदेशीर ठरेल. शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून भाग्य स्थानातून भ्रमण करणार आहे. यामुळे या काळात तुम्हाला देश-विदेशातील प्रवासाची संधी मिळू शकते. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना या काळात मोठे यश मिळू शकते.
advertisement
5/5
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन सकारात्मक फळे देणारे ठरेल. हे गोचर तुमच्या कुंडलीतील तिसऱ्या भावात होणार आहे. यामुळे तुमच्या धैर्यामध्ये आणि पराक्रमात वाढ होईल. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल, तर तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतो. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले वाद तुमच्या बाजूने सुटतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: सगळीकडून फक्त निराशा! आता शुक्र तुमच्या राशीच्या भाग्याचे दार उघडेल, पडझड थांबणार