आज एक चूकही पडू शकते महागात! बुध-गुरुची बदलेली चाल आणणार 4 राशींवर संकट, राहावं लागणार अलर्ट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
होलिका दहनानंतर रंगाचा उत्सव चंद्रग्रहणामुळे एक दिवस उशिरा साजरा केला जाणार आहे. बुध आणि गुरु वक्री अवस्थेमुळे मिथुन, तूळ, कुंभ, मीन राशींच्या जातकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
advertisement
1/7

2 मार्चला होलिका दहन साजरे करण्यात आले. प्रथेनुसार दरवर्षी रंगाची होळी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. पण यावर्षी चित्र मात्र वेगळं आहे. या वर्षी धुळवडला चंद्रग्रहण लागल्यामुळे रंगाचा उत्सव एक दिवसानंतर म्हणजेच आज साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत बुध आणि गुरु त्यांची चाल बदलणार आहेत.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे. बुद्धीचा कारक बुध 26 फेब्रुवारीपासूनच वक्री झाला असून तो 20 मार्चपर्यंत तसाच राहील. तसेच, भाग्याचा कारक गुरु देखील वक्री अवस्थेत असून तो 11 मार्च रोजी मार्गी होईल.
advertisement
3/7
बुध आणि गुरु या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या वक्री अवस्थेमुळे 4 राशींच्या जातकांनी आज विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुमची एक छोटीशी चूक आर्थिक किंवा मानसिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकते.
advertisement
4/7
मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध स्वतः वक्री असल्याने या राशीच्या व्यक्तींना मानसिक गोंधळाचा सामना करावा लागू शकतो. आज कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा, अन्यथा नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. घाईघाईत कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका.
advertisement
5/7
तूळ: तूळ राशीच्या लोकांसाठी वक्री गुरु आणि बुधाचा प्रभाव खर्च वाढवणारा ठरू शकतो. होळीच्या उत्साहात मर्यादा ओलांडू नका. वाहन चालवताना अत्यंत सावध राहा आणि अनोळखी व्यक्तींवर अतिविश्वास ठेवणे टाळा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
कुंभ: कुंभ राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. गुरु वक्री असल्याने नशिबाची साथ थोडी कमी मिळेल. आज शक्य असल्यास कोणताही नवीन प्रकल्प किंवा गुंतवणूक सुरू करू नका. कौटुंबिक वादांपासून दूर राहणेच हिताचे ठरेल.
advertisement
7/7
मीन: मीन राशीत सध्या शनि आणि शुक्र विराजमान आहेत, तर गुरुची वक्री दृष्टी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. आज खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. संतापावर ताबा मिळवणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर कोर्ट-कचेरीच्या कामात अडकू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज एक चूकही पडू शकते महागात! बुध-गुरुची बदलेली चाल आणणार 4 राशींवर संकट, राहावं लागणार अलर्ट