TRENDING:

Chaturgrahi Yog 2026: आपली वेळ आलीच! कुंभ राशीत चतुर्ग्रही योग जुळला, सूर्य-राहुची जोडी 3 राशींना श्रीमंत बनवणार

Last Updated:
Astrology Marathi: ग्रहांचे गोचर सतत होत असते, त्यातून शुभ-अशुभ योग जन्म घेतात. ज्योतिषशास्त्रानुसार 13 फेब्रुवारी रोजी सूर्य मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीपासूनच राहू आहेच. सूर्याच्या प्रवेशापूर्वी 3 फेब्रुवारीला बुध आणि 6 फेब्रुवारीला शुक्र देखील कुंभ राशीत येऊन बसतील.
advertisement
1/5
आपली वेळ आलीच! कुंभ राशीत चतुर्ग्रही योग जुळला, सूर्य-राहुची जोडी 3 राशींना लकी
अशा प्रकारे 13 फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये सूर्य, राहू, बुध आणि शुक्र या चार ग्रहांची युती होऊन 'चतुर्ग्रही योग' निर्माण होणार आहे. या योगाचा 3 राशींना प्रचंड फायदा होणार आहे. राशीचक्रातील या राशींच्या विषयी सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
2/5
मेष - कुंभ राशीत जुळून येत असलेला चतुर्ग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरेल. तुमच्या धनसंपत्तीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे विनाकारण होणारे खर्च कमी होतील आणि बँक बॅलन्स वाढेल.
advertisement
3/5
मेष राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील आणि कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. नवीन कपडे, दागिने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचे योग आहेत.
advertisement
4/5
कर्क - या चतुर्ग्रही योगामुळे कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणावर सुधारणार आहे. तुमचे खर्च नियंत्रणात राहतील आणि उत्पन्नात अनपेक्षित वाढ होईल. तुम्हाला गुप्त मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते, उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे वेगाने पूर्ण होतील. घर, फ्लॅट किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
कुंभ - हा चतुर्ग्रही योग तुमच्याच राशीत होत असल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. तुमची कमाई वाढणार असून विशेषतः व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ भरभराटीचा असेल. तुमच्या बोलण्यात आणि व्यक्तिमत्वात सकारात्मक सुधारणा होईल, ज्यामुळे तुमचे लोकांशी असलेले संबंध सुधारतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात तुम्ही जोडलेले नवीन लोक भविष्यात तुम्हाला दीर्घकालीन फायदा मिळवून देतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Chaturgrahi Yog 2026: आपली वेळ आलीच! कुंभ राशीत चतुर्ग्रही योग जुळला, सूर्य-राहुची जोडी 3 राशींना श्रीमंत बनवणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल