TRENDING:

अखेर प्रतीक्षा संपली! तब्बल 12 वर्षांनी 3 राशींना आला करोडपती होण्याचा योग, पैशांचा पाऊस पडणार

Last Updated:
Astrology News :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह हा सुमारे १३ महिन्यांनी राशी परिवर्तन करतो. सध्या गुरु मिथुन राशीत भ्रमण करत असून येत्या ऑक्टोबर महिन्यात तो वेगाने कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही गुरुची उच्च राशी मानली जाते.
advertisement
1/4
तब्बल 12 वर्षांनी या 3 राशींना आला करोडपती होण्याचा योग, पैशांचा पाऊस पडणार
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह हा सुमारे १३ महिन्यांनी राशी परिवर्तन करतो. सध्या गुरु मिथुन राशीत भ्रमण करत असून येत्या ऑक्टोबर महिन्यात तो वेगाने कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही गुरुची उच्च राशी मानली जाते. त्यामुळे या बदलामुळे अनेक राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. काहींना आर्थिक लाभ, प्रतिष्ठा, करिअरमध्ये यश तसेच वैवाहिक आयुष्यात समाधान मिळण्याची शक्यता आहे. चला पाहूया, कोणत्या राशींना या गुरु परिवर्तनाचा विशेष लाभ होणार आहे.
advertisement
2/4
कर्क राशी -  गुरुचा कर्क राशीत प्रवेश हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. कारण तो तुमच्या राशीत लग्न स्थानात भ्रमण करणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची ताकद व प्रभाव वाढेल. नोकरी करणाऱ्यांना बढतीची संधी मिळेल, तर व्यवसायिकांना भागीदारीतून चांगला नफा होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी विवाह प्रस्ताव येऊ शकतात. विवाहितांच्या नात्यात प्रेम व आपुलकी वाढेल. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याची संधी मिळेल.
advertisement
3/4
तूळ राशी -  तूळ राशीसाठी गुरुचे कर्क राशीत भ्रमण कर्म स्थानात होईल. या कालावधीत आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल. करिअरची सुरुवात करणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास आणि प्रशंसा मिळेल. व्यवसायिकांसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल काळ आहे. तसेच, सामाजिक वर्तुळ वाढल्यामुळे तुमची ओळख आणि मानमरातब वाढेल.
advertisement
4/4
मिथुन राशी -  गुरु मिथुन राशीतून दुसऱ्या स्थानात म्हणजेच धन व वाणीच्या स्थानी भ्रमण करेल. त्यामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा मिळू शकतो. कुठे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना स्थिरता लाभेल, तर व्यवसायिकांना सातत्याने नफा मिळत राहील. वैवाहिक जीवनात आनंद व समाधान लाभेल. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्या शब्दांकडे आकर्षित होतील. (सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अखेर प्रतीक्षा संपली! तब्बल 12 वर्षांनी 3 राशींना आला करोडपती होण्याचा योग, पैशांचा पाऊस पडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल