TRENDING:

शेवटी नशिबाने साथ दिलीच! पुढच्या काही तासांत या 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू

Last Updated:
Trigrahi Yog : ज्योतिषशास्त्रानुसार 26 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. आज चंपाषष्ठी असल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
advertisement
1/6
शेवटी नशिबाने साथ दिलीच! पुढच्या काही तासांत या 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू
ज्योतिषशास्त्रानुसार आज 26 नोव्हेंबरचा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. आज चंपाषष्ठी असल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. याच दिवशी ज्योतिषशास्त्रातील तीन प्रभावी ग्रह शुक्र, मंगळ आणि सूर्य एकत्र येत असून, या दुर्मिळ युतीमुळे त्रिग्रही योग तयार होत आहे.
advertisement
2/6
हा योग 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 या काळात प्रभावी राहणार आहे. शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करताच सूर्य आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या सहवासात येतो आणि त्यामुळे तयार होणारा त्रिग्रही योग अत्यंत शक्तिशाली मानला जातो. हा योग काहींसाठी अत्यंत शुभफलदायी तर काहींसाठी मिश्र परिणाम देणारा ठरतो. मात्र, या वर्षी तयार होत असलेला त्रिग्रही योग तीन राशींना विशेष लाभदायक ठरणार असल्याचे ज्योतिषी सांगतात.
advertisement
3/6
मेष  - ज्योतिषशास्त्रानुसार या योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. नशीब तुमच्या बाजूने काम करेल आणि अनेक प्रलंबित कामांना गती मिळेल. न्यायालयीन किंवा सरकारी प्रकरणांमध्ये अनुकूल निकाल मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा नफा होईल तर नोकरीत पदोन्नतीचे योग प्रबळ आहेत. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा कालावधी उत्तम असून घरखरेदीची संधीही मिळू शकते. परदेशप्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही हा काळ सोयीचा मानला जात आहे.
advertisement
4/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. व्यवसायात नफा वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. काहींना आकर्षक नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. परदेश प्रवासाचे योग दिसत असून मोठा करार किंवा प्रकल्प मिळण्याची संधी आहे. प्रेमसंबंधांमध्ये आनंद आणि स्थैर्य निर्माण होईल. गुंतवणुकीतूनही चांगला फायदा मिळण्याचे संकेत आहेत.
advertisement
5/6
धनु - धनु राशीवर त्रिग्रही योगाचे अत्यंत शुभ परिणाम दिसून येतील. नवीन कामाची सुरुवात यशस्वी होईल. कामातील अडथळे दूर होतील आणि करिअरमध्ये प्रयत्नांना यश मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल आणि तीर्थयात्रेची संधी संभवते. करिअरला नवी दिशा देणारी एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ फायदेशीर राहणारा असून जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
<strong>(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही) </strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
शेवटी नशिबाने साथ दिलीच! पुढच्या काही तासांत या 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल