उद्यापासून सुरू होणार होलाष्टक! 'या' राशींसाठी पुढचे 8 दिवस धोक्याचे, सहन करावा लागणार भयंकर त्रास
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उद्या, 24 फेब्रुवारी 2026 पासून हिंदू धर्मात अशुभ मानल्या जाणाऱ्या 'होलाष्टका'ची सुरुवात होत आहे. होळीपूर्वीचे हे आठ दिवस ज्योतिषशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानले जातात. यंदा होलाष्टक 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत असेल.
advertisement
1/7

उद्या, 24 फेब्रुवारी 2026 पासून हिंदू धर्मात अशुभ मानल्या जाणाऱ्या 'होलाष्टका'ची सुरुवात होत आहे. होळीपूर्वीचे हे आठ दिवस ज्योतिषशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानले जातात. यंदा होलाष्टक 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत असेल. विशेष म्हणजे, यंदा होलाष्टकाची सांगता चंद्रग्रहणाने होत असल्याने ग्रहांची स्थिती अधिकच उग्र बनली आहे. ज्याचा सर्वात जास्त नकारात्मक परिणाम 'या' राशींवर होणार आहे.
advertisement
2/7
मेष: तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या राहूच्या प्रभावाखाली असल्याने तुमची चिडचिड वाढेल. जमीन-जुमल्याच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा, अन्यथा तुमची प्रगती थांबू शकते.
advertisement
3/7
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी हे 8 दिवस पैशांच्या बाबतीत धोक्याचे आहेत. अनावश्यक खर्च वाढल्याने तुमचे बजेट कोलमडू शकते. कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
4/7
सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती मानसिक तणाव वाढवणारी असेल. अचानक उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही हैराण होऊ शकता. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका; जवळचे मित्रच तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतात.
advertisement
5/7
कन्या: कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ कौटुंबिक कलहाचा ठरू शकतो. जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरून मोठे वाद होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा जुन्या नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होऊ शकतो.
advertisement
6/7
मकर: मकर राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी परिस्थिती कठीण राहील. कष्टाचे फळ उशिरा मिळाल्याने तुम्ही निराश व्हाल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर 3 मार्चपर्यंत कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका.
advertisement
7/7
कुंभ: तुमच्याच राशीत राहू आणि मंगळाची युती होत असल्याने निर्णयक्षमता कमकुवत होईल. स्वतःच्या निर्णयावर संशय येईल. अपघाताचे योग असल्याने वाहन जपून चालवा. या काळात शांत राहणे आणि कोणताही मोठा बदल टाळणे हिताचे ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उद्यापासून सुरू होणार होलाष्टक! 'या' राशींसाठी पुढचे 8 दिवस धोक्याचे, सहन करावा लागणार भयंकर त्रास