Holi 2025: हलगर्जीपणा अंगलट, कामाचे तीन-तेरा! होळी या राशींच्या घरावर विस्तव आणेल; सावध रहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Holi Horoscope 2025: 14 मार्च रोजी होळीचा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. होळी आपल्या आयुष्यात आनंद आणेल, दु:ख जाळेल अशी, प्रत्येकालाच अपेक्षा असते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून यावर्षीची होळी विशेष महत्त्वाची आहे, कारण होळीनंतर लगेचच राहू आणि केतू हे दोन मोठे ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहेत.
advertisement
1/6

होळीनंतर लगेचच 16 मार्च रोजी राहू हा ग्रह पूर्वा भाद्रपदात तर केतू हा ग्रह उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या बदलाचा काही राशींवर मोठा परिणाम होऊ शकतो.
advertisement
2/6
मेष राशीच्या लोकांना राहू आणि केतूच्या नक्षत्र बदलामुळे जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात वैवाहिक जीवनात मतभेद आणि जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही समस्या उद्भवू शकतात.
advertisement
3/6
मेष- होळीच्या दिवशी कोणत्याही दुर्घटना किंवा अपघातांपासून सावधगिरी बाळगावी. आरोग्यावर मोठा खर्च होऊ शकतो. उपाय म्हणून मेष राशीच्या लोकांनी काळ्या कापडात एक नारळ आणि 11 पूर्ण बदाम बांधून होळीत टाकावेत.
advertisement
4/6
कन्या राशीच्या लोकांचा होळीचा आनंद राहू आणि केतूच्या नक्षत्र बदलामुळे कमी होऊ शकतो. कार्यक्षेत्रात बदल होण्याची किंवा नोकरी जाण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे.
advertisement
5/6
कन्या - नक्षत्र बदलामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. जास्त विचार करणे टाळा. उपाय म्हणून कन्या राशीच्या लोकांनी होळीच्या अग्नीत सप्तधान्य अर्पण करावे.
advertisement
6/6
मीन राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा खर्च टाळावा. होळीच्या दिवशी दारू पिऊन किंवा इतर कोणत्याही आजारपणामुळे आरोग्यावर मोठा खर्च होऊ शकतो. उपाय म्हणून मीन राशीच्या लोकांनी घरात भगवान श्रीकृष्णाची शेषनागावर नृत्य करत असलेली प्रतिमा असलेली पूजा करावी.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Holi 2025: हलगर्जीपणा अंगलट, कामाचे तीन-तेरा! होळी या राशींच्या घरावर विस्तव आणेल; सावध रहा