नशिबाचा खेळ बदलणार राहू, 'या' 3 राशींचा सुरू होणार 'गोल्डन टाइम'; घर, गाडीचं स्वप्न होणार पूर्ण!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये राहू ग्रहाला 'कलियुगाचा राजा' आणि अनपेक्षित फळ देणारा ग्रह मानले जाते. राहू जेव्हा शुभ स्थितीत असतो, तेव्हा व्यक्तीला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतो.
advertisement
1/5

ज्योतिषशास्त्रामध्ये राहू ग्रहाला 'कलियुगाचा राजा' आणि अनपेक्षित फळ देणारा ग्रह मानले जाते. राहू जेव्हा शुभ स्थितीत असतो, तेव्हा व्यक्तीला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतो.
advertisement
2/5
2026 हे वर्ष राहूच्या प्रभावामुळे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः 30 डिसेंबर 2025 पासून 15 एप्रिल 2026 पर्यंत राहू ग्रह 'युवावस्थेत' (12 ते 18 डिग्रीमध्ये) असल्याने त्याची शक्ती दुपटीने वाढली आहे.
advertisement
3/5
धनु: धनु राशीच्या लोकांसाठी राहूचे हे गोचर वरदान ठरेल. राहूच्या युवावस्थेमुळे तुमच्या करिअरमध्ये अभूतपूर्व प्रगती होईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. व्यवसायात नवीन करार होतील आणि परदेश प्रवासाचे योग जुळून येतील. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील.
advertisement
4/5
कुंभ: राहू सध्या कुंभ राशीतच भ्रमण करत असून 5 डिसेंबर 2026 पर्यंत तो याच राशीत राहणार आहे. राहू स्वतःच्या राशीत किंवा मित्राच्या राशीत असल्याने कुंभ राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
मीन: मीन राशीच्या जातकांसाठी राहूची ही अवस्था आर्थिक स्थिती मजबूत करणारी ठरेल. राहू तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध करून देईल. परदेशी कंपन्यांशी संबंधित कामात प्रचंड यश मिळेल. तुमची निर्णयक्षमता वाढेल, ज्यामुळे व्यवसायात मोठे आर्थिक लाभ होतील. शत्रूंवर विजय मिळवाल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
नशिबाचा खेळ बदलणार राहू, 'या' 3 राशींचा सुरू होणार 'गोल्डन टाइम'; घर, गाडीचं स्वप्न होणार पूर्ण!