IND vs NZ : 22व्या ओव्हरला कमबॅक, 94 ओव्हरच्या पाचव्या बॉलला मॅच फिरलीच; दोन चेंडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे टर्निंग पॉइंट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वडोदराच्या मैदानात न्यूझीलंडने दिलेले 300 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज गाठत हा सामना 4 विकेटने जिंकला होता.टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार हा हर्षित राणा ठरला आहे.
advertisement
1/7

वडोदराच्या मैदानात न्यूझीलंडने दिलेले 300 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज गाठत हा सामना 4 विकेटने जिंकला होता.टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार हा हर्षित राणा ठरला आहे.
advertisement
2/7
विराट मैदानात आल्यानंतर त्याने सुरुवातीपासूनच आक्रामक खेळी केली.या खेळी दरम्यान शुभमन गिल अर्धशतक ठोकून बाद झाला.त्याच्यानंतर विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर असताना 93 वर आऊट झाला. पण नंतर जडेजा आल्या पावली माघारी गेला.
advertisement
3/7
श्रेयस अय्यर सामना जिंकवेल असे वाटत होते. पण तो देखील अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला.त्यानंतर राहुल आणि मॅच विनर हर्षित राणाची एंन्ट्री झाली.
advertisement
4/7
हर्षित राणाने या सामन्यात 22 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हेन्री निकोलसनची विकेट घेऊन भारताचं कमबॅक केलं होतं. त्यानंतर 94 ओव्हरच्या पाचव्या बॉलला (43.5 ओव्हरमध्ये) मॅच फिरली होती.
advertisement
5/7
त्याचं झालं असं की विराट श्रेयसच्या उत्कृष्ट खेळीनंतर बाकी सगळे खेळाडू अडखळले.तिकडे हर्षित राणाने एकट्याने मैदानात उभं राहुन 29 धावा केल्या. याच धावा टीम इंडियाच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्या.
advertisement
6/7
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 300 धावा ठोकल्या होत्या. न्यूझीलंडकडून डेरील मिचेलने 84 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.त्याच्यासोबत हेन्री निकोलसने 62 आणि डेवॉन कॉन्वेने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
7/7
टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट घेतले. तर कुलदीप यादवने एक विकेट घेतली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 22व्या ओव्हरला कमबॅक, 94 ओव्हरच्या पाचव्या बॉलला मॅच फिरलीच; दोन चेंडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे टर्निंग पॉइंट