TRENDING:

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; संयमाची परीक्षा, पण अडचणीतूनच..

Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. काही राशींना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल, तर काहींना संयम आणि सतर्कता बाळगावी लागेल. काही राशीच्या लोकांना कामाचा ताण, मानसिक ओढाताण, विरोधकांचा त्रास आणि आर्थिक दबाव जाणवू शकतो. अडचणींनंतर काही राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
advertisement
1/6
सिंह कन्या तूळ वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; संयमाची परीक्षा, पण अडचणीतूनच..
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असेल. तुमच्या आसपास असे काही लोक असतील जे तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध राहा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जवळची नाती दुरावू शकतात. जुना आजार पुन्हा डोके वर काढू शकतो, त्यामुळे वेळेवर औषधे घ्या. आर्थिक बाबतीत कोणालाही कर्ज देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्यास अडचण येईल.
advertisement
2/6
कन्या - आठवड्याची सुरुवात थोडी संथ होईल, पण जसा आठवडा पुढे जाईल तसे यश तुमच्याकडे चालून येईल. जमीन आणि मालमत्तेच्या व्यवहारात असलेले अडथळे दूर होतील. आर्थिक बाजू भक्कम होईल आणि तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/6
कन्या राशीच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे तुम्हाला एखादी नवीन व्यावसायिक संधी मिळू शकते.
advertisement
4/6
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या हितशत्रूंपासून लांब राहावे. नोकरीत आपले गुपित कोणाशीही शेअर करू नका. जरी तुम्हाला सध्याच्या कामात समाधान वाटत नसले, तरी घाईने राजीनामा देऊ नका. आठवड्याच्या शेवटी होणारा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये सुसंवाद राहील. नवीन विवाहितांना कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
advertisement
5/6
वृश्चिक - तुमच्यासाठी हा आठवडा संघर्षाचा असू शकतो. अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. राजकारणातील लोकांना आपल्याच सहकाऱ्यांकडून धोका मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाचे ठिकाण अशा दोन्ही आघाड्यांवर कसरत करावी लागेल.
advertisement
6/6
वृश्चिक राशीच्या लोकांनी आळस सोडून कामाला लागल्यास आठवड्याच्या अखेरीस काही प्रमाणात यश मिळेल. घरातील एखाद्या मंगल कार्यामुळे मनावरचा ताण कमी होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; संयमाची परीक्षा, पण अडचणीतूनच..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल