Shravan: महादेवाच्या सगळ्यात प्रिय राशींमध्ये तुम्ही आहात? यंदाच्या श्रावणात चांगले दिवस, विवाह ठरणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Marathi Shravan 2025 : श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि विशेष मानले जाते. या महिन्यात उत्साहाने लोक महादेवाची पूजा करतात, या काळात धार्मिक व्रत, उपवास आणि पूजा-अर्चांना खूप महत्त्व दिले जाते. श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष शंकराने प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले. हे विष पचवण्यासाठी त्यांना शीतलता आवश्यक होती, ती श्रावण महिन्यात पर्जन्यवृष्टीमुळे मिळते असे मानले जाते. म्हणूनच या महिन्यात शिवावर जलाभिषेक केल्याने ते लवकर प्रसन्न होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
1/4

या वर्षी 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. यंदाच्या श्रावणात 4 सोमवार येतील. ज्योतिषशास्त्रात महादेवाच्या काही आवडत्या राशी सांगितल्या आहेत. श्रावण महिन्यात या राशींवर शंकराची विशेष कृपा असणार आहे. जाणून घ्या या कोणत्या भाग्यवान राशी आहेत.
advertisement
2/4
मेष - श्रावणात महादेव मेष राशीच्या लोकांवर खूप कृपा करणार आहेत. तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतात. प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगाचा जलाभिषेक करा आणि मंत्राचा जप केल्यानं अडकलेली कामं पूर्ण होतील.
advertisement
3/4
कर्क - कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, महादेव या राशीच्या लोकांवर विशेष कृपा करतात. या राशीच्या लोकांना श्रावणामध्ये पैसे मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष फायदा होईल.
advertisement
4/4
मकर - मकर राशीचा स्वामी शनि आहे, तो महादेवाचा भक्त आहे. महादेव मकर राशीच्या लोकांवर कृपा करतात. श्रावणात या लोकांच्या जीवनात सकारात्मकता वाढेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. श्रावण सोमवारी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करणे फायदेशीर ठरेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shravan: महादेवाच्या सगळ्यात प्रिय राशींमध्ये तुम्ही आहात? यंदाच्या श्रावणात चांगले दिवस, विवाह ठरणार