टेन्शन सोडा! शनीच्या प्रिय राशींवर बरसणार सूर्याची कृपा, 'या' लोकांसाठी खास असणार मकर संक्राती
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीचा दिवस हा सूर्य आणि शनीच्या भेटीचा पवित्र दिवस मानला जातो. उद्या, 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून आपला पुत्र शनीच्या 'मकर' राशीत प्रवेश करतील.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीचा दिवस हा सूर्य आणि शनीच्या भेटीचा पवित्र दिवस मानला जातो. उद्या, 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून आपला पुत्र शनीच्या 'मकर' राशीत प्रवेश करतील. सूर्य आणि शनी जरी एकमेकांचे शत्रू मानले जात असले, तरी मकर संक्रांतीच्या दिवशी पिता सूर्य आपल्या पुत्राच्या घरी त्याला भेटायला जातात.
advertisement
2/7
तूळ: तूळ ही शनीची 'उच्च' रास आहे, त्यामुळे शनी या राशीवर नेहमीच मेहेरबान असतो. मकर संक्रांतीला सूर्याचे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी सुख-समृद्धी घेऊन येईल. तुम्हाला मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित सुख मिळेल. जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर हा काळ उत्तम आहे. आईकडून धनलाभ होण्याचे योग आहेत आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
3/7
मकर: सूर्याचे गोचर तुमच्याच राशीत होत असल्याने हे वर्ष तुमच्यासाठी बदलांचे ठरेल. शनी स्वतःचा राशीस्वामी असल्याने सूर्याचे आगमन येथे शुभ फळ देईल. तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. सरकारी कामात अडकलेले प्रश्न सुटतील. शनीच्या शिस्तीमुळे आणि सूर्याच्या तेजामुळे तुम्हाला करिअरमध्ये मोठी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
4/7
कुंभ: कुंभ ही शनीची मूळ त्रिकोण रास आहे. सध्या या राशीवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, अशा वेळी सूर्याचे मकर राशीतील संक्रमण तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. परदेश प्रवासाचे योग जुळून येतील. खर्चावर नियंत्रण येईल आणि आत्मिक शांती मिळेल. रखडलेली कामे वेग धरतील आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
advertisement
5/7
सूर्य आणि शनी या दोन परस्परविरोधी ऊर्जांच्या मिलनामुळे शिस्त आणि सत्ता यांचा ताळमेळ बसतो, जो प्रगतीसाठी आवश्यक असतो. मकर राशीत सूर्याच्या आगमनाने काही राशींच्या कुंडलीत 'शश' आणि 'आदित्य' योगाचे शुभ परिणाम दिसून येतात.
advertisement
6/7
साडेसातीचा प्रभाव कमी: शनीच्या प्रिय राशींवर सूर्याची दृष्टी पडल्याने साडेसाती किंवा ढैय्यामुळे होणारा मानसिक त्रास कमी होतो. या काळात ज्या राशीचे लोक साडेसातीचा सामना करत आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळतो आणि त्रास कमी सहन करावा लागतो. सूर्याची कृपा दृष्टी त्या राशींच्या लोकांवर राहते.
advertisement
7/7
इतर फायदे: या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकालीन नफा देते. विशेषतः सोने किंवा तांबे खरेदी करणे या राशींसाठी शुभ ठरेल. तसंच मकर संक्रांतीनंतर खरमास संपत असल्याने विवाह आणि नवीन व्यवसायासारखी शुभ कार्ये यशस्वी होतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
टेन्शन सोडा! शनीच्या प्रिय राशींवर बरसणार सूर्याची कृपा, 'या' लोकांसाठी खास असणार मकर संक्राती