TRENDING:

पहिल्या दिवशी 'तुफान' अन् आता नॉमिनेशनच्या पतंगाची टांगती तलवार! BBM6 च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मोठा राडा

Last Updated:
पहिल्या दिवसाचा धक्का पचवण्याआधीच आता दुसऱ्या दिवशी मोठा धमाका होणार आहे. समोर आलेल्या इनसाइड फोटोंनुसार, घरात पहिले नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.
advertisement
1/8
BBM6 Ep. 2: पहिल्या दिवशी 'तुफान' अन् आता नॉमिनेशनच्या पतंगाची टांगती तलवार!
मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाचा श्रीगणेशा झाला आणि अवघ्या २४ तासांत घराचं चित्रच पालटलं आहे. ज्या १७ स्पर्धकांनी मोठ्या रुबाबात "आम्हीच किंग" म्हणत घरात पाऊल ठेवलं होतं, त्यांना पहिल्याच दिवशी बिग बॉसने जमिनीवर आणलं आहे.
advertisement
2/8
रितेश देशमुख यांनी प्रीमियरला म्हटल्याप्रमाणे नशिबाचा खेळ खरोखरच फिरला असून, आता घरामध्ये पहिल्याच दिवसापासून तुफान राडा पाहायला मिळत आहे.
advertisement
3/8
८०० खिडक्या आणि ९०० दारांच्या या चकचकीत घरामध्ये शिरल्यावर सदस्यांना वाटलं होतं की, किमान एखादा दिवस तरी लाड होतील. पण बिग बॉसने त्यांचा हा गैरसमज पहिल्याच तासांत मोडीत काढला. बिग बॉसने जाहीर केलं की, या घरात काहीही मोफत मिळणार नाही. तुम्हाला हवं असलेलं रेशन आणि सुखसुविधा 'गोल्डन, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ' कार्डच्या आधारावरच मिळतील.
advertisement
4/8
खरा थरार तेव्हा सुरू झाला जेव्हा घरात तुफान येण्याची घोषणा झाली. पाच मिनिटांचा टायमर लावून सदस्यांना एक बझर दाबण्याचं आव्हान दिलं होतं. पण "बघू काय होतंय" या अतिआत्मविश्वासात सदस्यांनी बझरकडे पाठ फिरवली.
advertisement
5/8
मग काय? बिग बॉसचा पारा चढला आणि त्यांनी बेडरूम, फर्निचर, इतकंच काय तर घराच्या खिडक्यांनाही टाळं ठोकलं! परिणामी, 'मेहनतीचा मार्ग' निवडलेले स्पर्धक जमिनीवर बसलेले दिसले, तर 'शॉर्टकट'वाल्यांना कसाबसा सोफ्याचा आसरा मिळाला.
advertisement
6/8
पहिल्या दिवसाचा हा धक्का पचवण्याआधीच आता दुसऱ्या दिवशी मोठा धमाका होणार आहे. समोर आलेल्या इनसाइड फोटोंनुसार, घरात पहिले नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. विशेष म्हणजे, मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून हा टास्क पतंग थीमवर आधारित आहे.
advertisement
7/8
घराच्या गार्डन एरियामध्ये प्रत्येक स्पर्धकाचा फोटो असलेला पतंग लावण्यात आला आहे. आता हे नॉमिनेशन कसं होणार? कोणाचा पतंग कापला जाणार आणि कोणाची मांजावर पकड घट्ट राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनच्या कचाट्यात कोण सापडणार, यावरून स्पर्धकांमध्ये आतापासूनच गुप्त खलबतं सुरू झाली आहेत.
advertisement
8/8
सुखसुविधा तर गेल्याच, पण आता साखरेचा एक दाणा आणि चहाच्या कपासाठीही घरात संघर्ष पाहायला मिळतोय. रेशनच्या विभाजनावरून सदस्यांमध्ये ठिणगी पडली असून, चहा-नाश्त्याच्या मुद्द्यावरून गटबाजीला सुरुवात झाली आहे. एका बाजूला भूक आणि दुसऱ्या बाजूला नॉमिनेशनची टांगती तलवार, अशा कात्रीत यंदाचे स्पर्धक अडकले आहेत.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्या दिवशी 'तुफान' अन् आता नॉमिनेशनच्या पतंगाची टांगती तलवार! BBM6 च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मोठा राडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल