'मी सुरकुत्या लपवत नाही!' जया बच्चन यांचा थेट निशाणा; रेखा यांना उद्देशून टोमणा मारला? नक्की काय घडलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एका मुलाखतीत जया बच्चन यांनी वाढतं वय आणि सौंदर्याबाबत असं काही विधान केलं आहे, ज्याने सोशल मीडियावर धुराळा उडालाय.
advertisement
1/7

मुंबई: बॉलिवूडच्या 'अँग्री ओल्ड लेडी' अशी ओळख असलेल्या जया बच्चन आपल्या सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मग ते पापाराझींवर ओरडणं असो किंवा संसदेत आपला मुद्दा ठासून मांडणं असो, जयाजी कधीच मागे हटत नाहीत.
advertisement
2/7
पण आता एका मुलाखतीत त्यांनी वाढतं वय आणि सौंदर्याबाबत असं काही विधान केलं आहे, ज्याने सोशल मीडियावर धुराळा उडालाय. या विधानाचा रोख थेट अभिनेत्री रेखा यांच्याकडे तर नाही ना? अशा शंकेची पाल नेटकऱ्यांच्या मनात चुकचुकली आहे.
advertisement
3/7
वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर दिसणाऱ्या बदलांना आजकालच्या अभिनेत्री बोटॉक्स किंवा कॉस्मेटिक सर्जरीच्या साह्याने लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जया बच्चन यांनी या ट्रेंडवर जोरदार प्रहार केला.
advertisement
4/7
त्या म्हणाल्या, "मी कधीच माझं वय लपवण्याचा प्रयत्न केला नाही. आज माझे केस पांढरे झाले आहेत, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत, पण मला त्याची लाज वाटत नाही. उलट, हा माझ्या आयुष्याचा प्रवास आहे आणि मी तो सन्मानाने स्वीकारला आहे."
advertisement
5/7
जयाजी पुढे असंही म्हणाल्या की, त्यांनी आजवर कोणतीही कृत्रिम सौंदर्य प्रक्रिया केलेली नाही आणि भविष्यातही तसा कोणताही विचार नाही. सौंदर्यापेक्षा तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, असं त्यांनी ठामपणे मांडलं.
advertisement
6/7
जया बच्चन यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी सोशल मीडियावरील युझर्सनी त्याचे अर्थ काढायला सुरुवात केली आहे. एका बाजूला ७० व्या वर्षीही सदाबहार आणि चिरतरुण दिसणाऱ्या रेखा आहेत, ज्या आजही आपल्या स्टाईल आणि सौंदर्याने सर्वांना भुरळ घालतात. त्यामुळे जयाजींचे हे वक्तव्य रेखा यांना मारलेला टोमणा तर नाही ना? असा तर्क लावला जात आहे.<span style="font-size: 20px;"> </span> <span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
7/7
नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा ओघ पाहिला तर दोन गट पडले आहेत. एक गट म्हणतो, "जयाजींचं म्हणणं अगदी बरोबर आहे, वय स्वीकारायला हिंमत लागते." दुसरा गट म्हणतो, "कोणाचंही नाव न घेता टोमणे मारण्यात जयाजींचा हात कोणीच धरू शकत नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी सुरकुत्या लपवत नाही!' जया बच्चन यांचा थेट निशाणा; रेखा यांना उद्देशून टोमणा मारला? नक्की काय घडलं