TRENDING:

Team India : सुंदरने कॅप्टनचं टेन्शन वाढवलं, वर्ल्ड कप टीममध्ये कोण घेणार जागा? 5 खेळाडूंमध्ये रेस!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी आयुष बदोनीला टीममध्ये स्थान मिळालं आहे.
advertisement
1/9
सुंदरने टेन्शन वाढवलं, वर्ल्ड कप टीममध्ये कोण घेणार जागा? 5 खेळाडूंमध्ये रेस!
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपआधी भारताला हा दुसरा धक्का आहे. तिलक वर्मानंतर आता वॉशिंग्टन सुंदरही न्यूझीलंड सीरिजमधून बाहेर झाला आहे. बडोद्यामध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यावेळी सुंदरला दुखापत झाली.
advertisement
2/9
वॉशिंग्टन सुंदरऐवजी आयुष बदोनीला टीम इंडियात स्थान मिळालं आहे. सुंदरची दुखापत किती गंभीर आहे? तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स अजून कायम आहे.
advertisement
3/9
वॉशिंग्टन सुंदरच्या बरगडीला दुखापत झाली आहे. सुंदर वेळेत फिट झाला नाही, तर निवड समितीला टी-20 वर्ल्ड कपसाठी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. भारतातले बहुतेक स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर हे डावखुरे आहेत, ज्यात कृणाल पांड्या, शाहबाज अहमद आणि अनुकूल रॉय यांचा समावेश आहे. टीममध्ये आधीच अक्षर पटेल असल्यामुळे आणखी एका डावखुऱ्या स्पिन ऑलराऊंडरला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
4/9
सुंदर फिट झाला नाही तर टी-20 वर्ल्ड कपसाठी रियान पराग हा पर्याय ठरू शकतो. पराग हा ऑफ स्पिन बॉलिंगसह मिडल ऑर्डरला बॅटिंग करतो. तसंच त्याची बॅटिंग आणि शॉट मारण्याची क्षमता सुंदरपेक्षा चांगली आहे. बॉलिंगमध्ये पराग सुंदरएवढा विश्वासार्ह नसला तरी त्याच्याकडे विकेट घेण्याची क्षमता आहे.
advertisement
5/9
भारताच्या वनडे टीममध्ये सुंदरची जागा बदोनीने घेतली आहे, त्यामुळे टी-20 टीममध्येही असा बदल होऊ शकतो. आयपीएलमध्ये लखनऊकडून खेळणारा आयुष बदोनी ऑलराऊंडर आहे. बॅटिंगसह बदोनी ऑफ स्पिन बॉलिंगही करतो.
advertisement
6/9
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सुंदरसारखा खेळाडू लागेल, जो सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर बॅटिंग आणि स्पिन बॉलिंग करू शकेल. लेग स्पिनर विप्राज निगम याचा विचारही निवड समिती करू शकते. विप्राज हा खालच्या क्रमांकाचा धोकादायक बॅटर आणि उत्कृष्ट लेग स्पिनर आहे. विप्राज आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळतो.
advertisement
7/9
अनुभवी ऑलराऊंडरला संधी द्यायची असेल तर टीम इंडियासमोर नितीश रेड्डी हा सर्वोत्तम पर्याय आहे. टीममध्ये आधीच 3 स्पिन बॉलर आहेत, अशा परिस्थितीमध्ये नितीश रेड्डीचा विचार गेला जाईल. टीममध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहेत, पण दोघांसाठी रेड्डीचा पर्याय असणं, गैरसोयीचे ठरणार नाही.
advertisement
8/9
टीममध्ये तीन स्पिनर (कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल) आणि तीन ऑलराऊंडर (हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल) असल्यामुळे आणखी एका ऑलराऊंडरऐवजी स्पेशलिस्ट बॅटरचाही विचार केला जाऊ शकतो. खासकरून टीममध्ये तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मादेखील आहेत, जे स्पिन बॉलिंग करू शकतात.
advertisement
9/9
सुंदरऐवजी स्पेशलिस्ट बॅटरची निवड करायची असेल, तर श्रेयस अय्यर हे सगळ्यात मोठे नाव आहे. श्रेयसची टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड झाली, तर तिलक वर्मालाही फिट होण्यासाठी वेळ देता येईल. तसंच श्रेयस टीम इंडियाची मिडल ऑर्डर आणखी मजबूत करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : सुंदरने कॅप्टनचं टेन्शन वाढवलं, वर्ल्ड कप टीममध्ये कोण घेणार जागा? 5 खेळाडूंमध्ये रेस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल