Tata उगाच नाव नाही! नवी कोरी Punch 2026 ट्रकला धडकली, टेस्ट रिपोर्ट पाहून सगळे अवाक्
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतात सर्वाधिक अपघात हे ट्रक आणि कारमध्ये होत असतात. त्यामुळे टाटाने एका उभ्या ट्रकवर जर Tata Punch 2026 ची समोरासमोर धडक झाली तर काय होईल, याची टेस्ट घेतली.
advertisement
1/8

टाटा मोटर्सच्या गाड्या या टँकसारख्या दणकट का असतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. टाटा मोटर्सची प्रत्येक कार आणि एसयूव्ही सेफ्टीमध्ये ५ स्टार घेऊनच येते. टाटाची लोकप्रिय टाटा पंच हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पण नव्या वर्षात टाटाने Tata Punch 2026 फेसलिफ्ट मॉडेल घेऊन आली आहे. पण लाँच होताच Tata Punch 2026 सुद्धा सेफ्टीमध्ये किंग निघाली आहे.
advertisement
2/8
टाटा मोटर्सने आपली Tata Punch 2026 आज लाँच केली. लाँच करण्याआधी टाटाने Tata Punch 2026 ची सेफ्टी टेस्ट घेतली.
advertisement
3/8
भारतात सर्वाधिक अपघात हे ट्रक आणि कारमध्ये होत असतात. त्यामुळे टाटाने एका उभ्या ट्रकवर जर Tata Punch 2026 ची समोरासमोर धडक झाली तर काय होईल, याची टेस्ट घेतली.
advertisement
4/8
भरधाव वेगात आलेली Tata Punch 2026 ही ट्रकवर आदळली. ही धडक इतकी जोरात होती की, ट्रक मागे सरकला. साहजिक या अपघातात Tata Punch 2026 च्या समोरील भागाचं नुकसान झालं.
advertisement
5/8
पण, ज्यासाठी टेस्ट घेतली होती, त्यामध्ये Tata Punch 2026 पास झाली. समोरील बसलेले प्रवाशी आणि मागे बसलेल्या लहान मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही.
advertisement
6/8
या टेस्टमध्ये Tata Punch 2026 च्या समोरील भागाचं नुकसान झालं पण प्रवासी जिथे बसले आहे ,तिथून पूर्ण फ्रेमचं काहीच नुकसान झालं नाही.
advertisement
7/8
या टेस्टमध्ये समोर बसलेल्या प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नाही. कारचे दरवाजे उघडले होते. तसंच एअरबॅग वेळेवर उघडली. सीट बेल्ट सुद्धा निघाले होते.
advertisement
8/8
Tata Punch 2026 Facelift ची किंमतही जाहीर करण्यातआली आहे. या गाडीची किंमत 5.59 लाखांपासून सुरू होत आहे. तर टॉप मॉडेल हे ९ लाखांपर्यंत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata उगाच नाव नाही! नवी कोरी Punch 2026 ट्रकला धडकली, टेस्ट रिपोर्ट पाहून सगळे अवाक्