TRENDING:

Mangal Gochar: जमणार की बिघडणार? मंगळाचा रास बदल तुमच्या राशीवर असा परिणाम करणार

Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रात शनिनंतर मंगळ ग्रहाच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. काही दिवसातच आता मंगळाचे राशीपरिवर्तन होणार आहे.. येत्या 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 08:27 वाजता मंगळ धनु राशीत प्रवेश करेल, 15 जानेवारी 2026 पर्यंत या ठिकाणी असेल. मंगळाचे राशी परिवर्तन लोकांना दिव्य ज्ञान, अध्यात्म, प्रवास आणि उच्च शिक्षण या विषयांवर भर देईल. धनु राशीतील मंगळ एक शक्तिशाली ऊर्जेची लाट आणेल. कृतीला प्रेरणा देईल तसेच पूर्वी टाळलेले धोके स्वीकारण्यास प्रेरित करेल. धनु राशीतील मंगळ काही राशींना स्मरणात राहणारे नवीन अनुभव, जीवनाचा अमर्याद आनंद वाढवू शकतो. धनु राशीतील मंगळाचे भ्रमण पहिल्या 6 राशींवर कसा परिणाम करेल, याविषयी ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
1/6
जमणार की बिघडणार? मंगळाचा रास बदल तुमच्या राशीवर असा परिणाम करणार
तूळ - धनु राशीत मंगळ आल्यावर तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावावर थेट प्रभाव पाडेल. तुम्ही संवाद, लेखन, प्रवास किंवा लहान व्यवसाय प्रकल्पांमध्ये रस घ्याल आणि यशही मिळेल. भावंडांशी संबंध पुन्हा चांगले होऊ शकतात किंवा अबोला दूर होऊ शकतो. तुमच्या योजना कागदावर आणा, कामात सावधगिरीने पुढे जा.
advertisement
2/6
वृश्चिक - मंगळाचे होणारे संक्रमण तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात (संपत्ती, मूल्ये, कौटुंबिक संसाधने) परिणाम दाखवेल. तुमचे उत्पन्न, मालमत्ता किंवा व्यवसाय संसाधने वाढतील; आर्थिक संधी, सौदे किंवा कामाची प्रशंसा शक्य आहे. पैसे आणि गुंतवणूक हुशारीने करा.
advertisement
3/6
धनु - मंगळ धनु राशीतच येत आहे. मंगळ तुमच्या पहिल्या भावात भ्रमण करेल. त्यानं धनु राशीच्या लोकांना अधिक दृढ, सक्रिय, महत्त्वाकांक्षी आणि प्रेरित वाटेल. हा काळ तुमची ओळख, पुढाकार आणि ऊर्जा बाहेर आणण्याची वेळ आहे. तुमच्या इच्छा आणि कृतींना संयम आणि दिशा द्या.
advertisement
4/6
मकर - मंगळाचे होणारे संक्रमण तुमच्या बाराव्या भावावर (विभक्तता, खर्च, अध्यात्म, गुप्त शत्रू) या गोष्टींवर परिणाम करेल. तुमचे अंतर्गत मनाचा फार विचार कराल, खर्च आणि एकटेपणा वाढू शकतो. आध्यात्मिक साधना किंवा सामाजिकतेसाठी वेळ काढा.
advertisement
5/6
कुंभ - कुंभेवर मंगळाचे गोचर काम करायला लावणार आहे, विश्रांतीला वेळ नसेल, मंगळ धनु राशीच्या 11 व्या घरात (नफा, मित्र, आकांक्षा) प्रभाव दाखवेल. तुमच्या स्वप्नांना व्यावहारिक योजनांमध्ये बदला.
advertisement
6/6
मीन - मंगळ ग्रहाचे हे संक्रमण तुमच्या 10 व्या भावावर (कर्म, प्रतिष्ठा, सार्वजनिक प्रतिमा) परिणाम करेल. तुमचे करिअर, व्यवसाय आणि प्रतिष्ठा भरभराटीला येईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangal Gochar: जमणार की बिघडणार? मंगळाचा रास बदल तुमच्या राशीवर असा परिणाम करणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल