TRENDING:

RatnaShastra: ऑफिस अन् तिथलं राजकारण नकोसं झालंय? या 5 पैकी एक रत्न धारण केल्यानं जादू पाहाल

Last Updated:
RatnaShastra Marathi:  रत्नशास्त्रानुसार काही विशिष्ट रत्ने धारणं केल्यानं अनेक अडचणींमधून सुटका मिळू शकते. रत्न धारण करण्याचा अनेकांना लाभ होऊ शकतो. राशीनुसार आणि इतर गोष्टींचा विचार करून रत्नाचा वापर केल्यास त्याचा फायदाच दिसून आला आहे. तुमचा मानसिक ताण वाढला असेल, किंवा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नसाल, किंवा ऑफिसच्या वातावरणामुळे तुम्हाला मानसिक ताण येत असेल तर तुम्ही तुमच्या ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार काही विशिष्ट रत्ने घालण्याचा विचार करावा. या रत्नांचा मनावर खोल आणि सकारात्मक परिणाम होतो. अशा पाच रत्नांबद्दल जाणून घेऊया, ते मानसिक ताण कमी करू शकतात किंवा रागाची स्थिती कमी करण्यास मदत करतात.
advertisement
1/5
ऑफिस अन् तिथलं राजकारण नकोसं झालंय? या 5 पैकी एक रत्न धारण केल्यानं जादू पाहाल
मोती - चंद्र हा मनाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याचे रत्न मोती आहे. मोती मन शांत करण्यासाठी आणि राग कमी करण्यासाठी घालणं फायद्याचं ठरतं. मानसिक ताण कमी होतो आणि मनातून नकारात्मकता दूर होते. मोती धारण केल्याने कुंडलीत चंद्र देखील मजबूत होतो.
advertisement
2/5
मूनस्टोन - मूनस्टोन रत्न पांढऱ्या रंगाचे असते, चमकल्यावर तो निळा किंवा दुधाळ होतो. मोत्याप्रमाणे या रत्नाचा मनावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि परिधान करणाऱ्याच्या घरात प्रकाशमय वातावरण राखण्यास मदत होते. मानसिक शांतीसोबतच, जीवनात सकारात्मकता देखील मिळते.
advertisement
3/5
अमेथिस्ट रत्न - अ‍ॅमेथिस्ट रत्नाला जामुनिया असंही म्हणतात, असं म्हटलं जातं की तो एखाद्याच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करतो आणि त्यानं सर्व कामे यशस्वी होतात. ते मानसिक शांती आणि एकाग्रता वाढवणारं रत्न मानलं जातं. धारण करणाऱ्याला शनि दोषापासून मुक्ती मिळते. ऑफिसमध्ये मनःशांती राहते आणि सर्व कामे यशस्वी होतात. खांदे आणि पाठीच्या कण्यातील समस्या दूर होतात.
advertisement
4/5
ब्ले लेस अ‍ॅगेट - ब्ले लेस अ‍ॅगेट हे रत्न अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी प्रभावी आहे. ज्यांना जास्त विचार करण्याची सवय आहे त्यांनी हे रत्न नक्कीच घालावं. या रत्नाचा मूड स्विंगवरही सकारात्मक परिणाम होतो. अशा काळात ते आश्चर्यकारकपणे काम करते, चिंता कमी करू शकते.
advertisement
5/5
लेपिडोलाइनट - लेपिडोलाइनट रत्न राग शांत करण्यास मदत करतं. जे लोक हे रत्न धारण करतात त्यांना तणाव कमी होऊन कामावर नीट लक्ष देण्यास फायदा मिळतो, मानसिक शांती मिळते. लेपिडोलाइनट जांभळ्या रंगाचा असतो आणि तो धारण केल्यानं अनावश्यक राग आणि ताण-तणावात माणूस येत नाही.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
RatnaShastra: ऑफिस अन् तिथलं राजकारण नकोसं झालंय? या 5 पैकी एक रत्न धारण केल्यानं जादू पाहाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल